Short Circuit Canva
गोवा

Colva Fire Incident: शॉर्टसर्किटमुळे कोलव्यात आग लागून नुकसान! अग्निशमनच्या तत्‍परतेमुळे मोठी दुर्घटना टळली

Colva Fire News: आग लागल्‍याचे लक्षात आल्‍यावर घराची कौले काढून स्‍थानिकांनी फोमचा फवारा मारल्‍याने ही आग दुसऱ्या खाेलीत पोहोचू शकली नाही

गोमन्तक डिजिटल टीम

मडगाव: कोलवा येथे गुरुवारी दुपारी रस्‍त्‍यावरील विजेच्‍या तारांतून उच्‍च दाबाचा वीजप्रवाह सुरू झाल्‍याने तेथे जवळच असलेल्‍या एका घरातील वीज उपकरणांनी पेट घेतला. मात्र, स्‍थानिक आणि अग्निशमन दलाच्‍या जवानांनी दाखविलेल्‍या तत्‍परतेमुळे ही आग एका खोलीतच सीमीत राहिल्‍याने मोठी दुर्घटना टळली.

या वीजप्रवाहाने शॉर्टसक्रिट होऊन ही आग लागल्‍याचा प्राथमिक अंदाज असून या भागात अशाप्रकारे विजेच्‍या उच्‍च दाबामुळे आग लागण्‍याची आणि वीज उपकरणे नादुरुस्‍त होण्‍याची ही तिसरी खेप असल्‍याचे स्‍थानिकांनी सांगितले.

आग लागलेले घर दुमजली असून त्‍याच्‍या खाली दुकानेही हाेती. दुपारच्या सुमारास लागलेल्या या आगीमुळे संपूर्ण इमारतीत आग पसरून भडका उडण्याचा धोका होता. मात्र, आग लागल्‍याचे लक्षात आल्‍यावर घराची कौले काढून स्‍थानिकांनी फोमचा फवारा मारल्‍याने ही आग दुसऱ्या खाेलीत पोहोचू शकली नाही.

अग्निशमन दलाचा बंबही वेळेवर पोहोचल्‍याने नंतर त्‍यांनी आग आटाेक्‍यात आणली. या आगीत घरातील एसी आणि इतर उपकरणे जळाल्‍याने सुमारे लाखभराची हानी झाली असून या भागात वारंवार विजेचा दाब का वाढतो, याची तपासणी वीज खात्‍याने करावी, अशी मागणी घरमालक फर्नांडिस यांनी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT