Fire in Goa Dainik Gomantak
गोवा

Fire In Goa: कुठ्ठाळीनंतर चिखली डोंगराळ भागात आग

धग आटोक्यात ः भैय्या कॉलनीतील रहिवाशांची सतर्कता; मिळवले नियंत्रण

गोमन्तक डिजिटल टीम

Fire In Goa कुठ्ठाळीनंतर आता काल मध्यरात्री चिखली डोंगराळ भागात उतरणीवर आग लागण्याची घटना घडली. भैय्या कॉलनीतील सतर्क रहिवाशांनी वेगाने फैलावत असलेल्या आगीवर नियंत्रण ठेवण्यात यश मिळविले. पुढची प्रक्रिया वास्को अग्निशमन दलाने पूर्ण केली व आगीवर नियंत्रण आणले.

काल बुधवारी मध्यरात्री चिखली येथे उतरणीवर डोंगराळ भागात आग लागल्याची घटना घडली. आग भैया कॉलनीच्या दिशेने फैलावत होती. आगीची माहिती फादर बॅालमेक्स परेरा, कॅप्टन विरीयातो, माजी सरपंच सेबी परेरा, पंच सदस्य रोमन वाझ, रुई कोस्टा अरावजो यांनी घटनास्थळी आगीवर नियंत्रणासाठी हालचाली सुरू केल्या.

किती वनसंपत्ती नष्ट झाली, सर्व्हे करा !

काँग्रेसचे नेते ऑलेन्सियो सिमाॅईश म्हणाले की, हा विषय गंभीर असून ही आग कशी लागली हे लोकांना कळायला हवे. आग ही कुणी लावल्याशिवाय लागत नाही. आग लागली यावर किती एफआयआर केल्या.

याची चौकशी केली की नाही, हे लोकांना समजणे गरजेचे आहे. त्यासाठी पर्यावरण मंत्र्यांनी हा विषयी गांभीर्याने चौकशी करून आगी लागण्याचे मूळ कारण शोधून काढणे गरजेचे आहे. तसेच या आगीच्या भक्ष्यस्थानी पडून किती झाडे नष्ट झाली याचे सर्वेक्षण करून त्याजागी नवीन झाडे लावण्याचे काम वनखात्याने करावे.

अन्यथा जमीन माफियांकडून हे रान, डोंगर विकले जाण्याची शक्यता असून हिरवळ नष्ट होणार आहे. त्यापूर्वी सरकारने यावर त्वरीत पावले उचलण्याची गरज आहे.

आगीच्या घटना गंभीर असून यामागे काहीतरी गौडबंगाल आहे. राज्यात कुणीतरी वनसंपत्ती नष्ट करण्याचा सपाटा लावला आहे. डोंगर कापून प्लॉट तयार केले जातात. आग ही लागली नसून लावण्यात आली आहे. गोव्यात ‘डीफोरेस्टेशन’ करून सरकार काय साध्य करू इच्छिते.

-कॅप्टन विरीयातो फर्नांडिस

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT