Fire In Goa: साट्रे, देरोडेनंतर झाडानीत अग्निप्रकोप !

वणव्याशी झुंज ः सहाव्या दिवशीही आग ; जंगलात निखारे धुमसणे सुरूच
Fire In Goa
Fire In GoaDainik Gomantak
Published on
Updated on

Fire In Goa सत्तरी तालुक्यात म्हादई अभयारण्यात पेटलेला वणवा दिवसेंदिवस पसरतच चालला आहे. आज गुरुवारी म्हादई अभयारण्यात साट्रे व देरोडे भागानंतर तसेच झाडानी भागात आग पसरली आहे.

साट्रे गावात याआधीच आग लागल्याने शमलेल्या जळक्या झाडांतूनही अजून धूर दिसतो आहे. त्यामुळे दूरवरून पुन्हा आग लागल्याचे जाणवते. गेले सहा दिवस म्हादई अभयारण्याचे वनअधिकारी, कर्मचारी, ट्रेकर्स आग विझविण्यासाठी निकराची झुंज देत आहेत.

म्हादई अभयारण्याला लागलेला वणवा शमण्याचे नाव घेत नाही, असे चित्र निर्माण झाले आहे. साट्रे, देरोडे, झाडानी हे एकाच रांगेत असलेला भाग आहे. साट्रे, देरोडे गावात गेल्या दोन दिवसांपासून वनखात्याने, नागरिकांनी आग शमवण्यासाठी कंबर कसली होती.

तरीही ही आग पसरतेय कशी हे गूढच बनले आहे. देरोडेतून ही आग वाढ झाडानी भागात आग पसरल्याचे वृत्त आहे. म्हादई वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी जाऊन कार्यरत आहेत.

मोर्ले गडावरील आग नियंत्रणात आहे. तरीही तिथे आज अग्निशमनचे वाहन तैनात ठेवले होते. विझलीय अशी वाटणारी आग धुमसतच आहे. आज नवीन झाडानी परिसरात आग लागल्यानंतर वनखात्याच्या कर्मचाऱ्यांनी तिथे धाव घेऊन मदतकार्य केले.

प्रसंगी नौदलाच्या विभागाला हेलिकॉप्टर मदतीसाठी पाठविण्यासंबंधी संदेश देण्यात आला आहे.

Fire In Goa
Fraud in Muthoot Finance: ‘मुथूट’च्या पर्वरी शाखेला 20.85 लाखांचा गंडा!

खोल दरीमुळे मदतकार्यात अडचण

म्हादई वनक्षेत्राचा पट्टा हा खोल दरीने काही ठिकाणी व्यापलेला आहे. मधूनच नदी वाहते होते. त्यामुळे दरीमुळे उंच ठिकाणी मदत कार्य करण्यात बरीच अडचण जाणवत आहे. रात्रीच्यावेळी अत्यंत घनदाट जंगलात जाणेही धोक्याचे बनले आहे.

तरीही वनखाते मदतीसाठी सक्रिय आहे. त्या भागात मोबाईल रेंज व्यवस्थित नसल्याने कोणालाही संपर्क करण्यास समस्या निर्माण झाली आहे.

Fire In Goa
Goa Accident: अपघातग्रस्त गाडीत अडकलेल्या चालकाची अर्ध्या तासाने सुटका

तरीही, आग धुमसतेच !

आज गुरुवारी साट्रे, देरोडे गावच्या डोंगरावर आग पसरलेल्या ठिकाणी हेलिकॉप्टरव्दारे पाण्याची फवारणी करण्यात आली आहे. तरीही नवी आग कशी काय पसरते, हे कोडेच बनले आहे.

गेल्या पाच दिवसांपासून लागलेल्या आगीमुळे जंगलातील लाकडे धुमसत आहेत. आग नियंत्रणात असली तरीही ती पसरत असल्याची भीती आहे. पण ही आग नेमकी पसरते कशी, या बाबत शंका निर्माण झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com