कळंगुट: कांदोळी किनाऱ्यावरील शॅक्सना भीषण आग लागल्याची बातमी ताजी असतानाच आज मंगळवारी पहाटे कळंगुटच्या मुख्य रस्त्यालगत असलेले चार शेडवजा गाळे आगीत भस्मसात झाले. या दुर्घटनेत 85 लाखांचे नुकसान झाल्याची माहिती दुकानमालक एडविन रॉड्रिगीस यांनी दिली. (Fire destroys 4 shops in Calangute)
‘बॉम्बे बाजार’ म्हणून ओळखली जाणारी ही दुकाने अनेक वर्षापासून या भागात कार्यरत होती. दुकानात झोपलेल्या कामगारांना दुकानात आग लागल्याचे कळताच तात्काळ अग्निशमन दलाला (FireBrigade) कळविण्यात आले. माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पणजी (Panjim), म्हापसा तसेच पिळर्ण येथील दलाच्या कर्मचाऱ्यांनी तासाभरात आगीवर नियंत्रण मिळवले.
शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज
सदर आगीची घटना शॉर्टसर्किटमुळे घडल्याचा अंदाज दुकानातील कामगारांकडून व्यक्त केला जात आहे. आगीचे नेमके कारण शोधण्याचा प्रयत्न अग्निशमन दलाकडून सुरू आहे. कळंगुट (Calangute) पंचायत मंडळाने घटनास्थळी धाव घेऊन माहिती घेतली. दुकानमालकांना आर्थिक मदत मिळवून देण्याचा प्रयत्न करू ,असे सरपंच शॉन मार्टिन्स यांनी सांगितले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.