Chandelier Fire Incident Vagator Dainik Gomantak
गोवा

Vagator Restaurant Fire: वागातोरमधील रेस्टॉरंटमध्ये 'फायर' ड्रामा! झुंबराला लागलेल्या आगीनं उडाली खळबळ; सुदैवाने जीवितहानी टळली VIDEO

Chandelier Fire Incident Vagator: गोव्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या वागातोर येथे एका रेस्टॉरंटमध्ये भीषण आग लागल्याची घटना समोर आली. हॉटेलमध्ये 'फायर' ड्रामा! झुंबराला लागलेल्या आगीने उडाली तारांबळ

Manish Jadhav

पणजी: गोव्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या वागातोर येथे एका रेस्टॉरंटमध्ये भीषण आग लागल्याची घटना समोर आली. या अचानक लागलेल्या आगीमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. मिळालेल्या माहितीनुसार, रेस्टॉरंटच्या छताला लावलेल्या एका मोठ्या झुंबराला अचानक आग लागली आणि पाहता पाहता या आगीने रौद्र रुप धारण केले. आगीच्या ज्वाळा दिसताच रेस्टॉरंटमध्ये उपस्थित असलेल्या ग्राहक आणि कर्मचाऱ्यांची एकच पळापळ सुरु झाली.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जवानांनी अत्यंत शिताफीने आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु केले. रेस्टॉरंटमध्ये फर्निचर आणि अन्य ज्वलनशील वस्तू असल्याने आग पसरण्याची भीती होती, मात्र अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे आग अधिक पसरण्यापूर्वीच विझवण्यात यश आले. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

आग (Fire) लागली तेव्हा रेस्टॉरंटमधील लोकांना वेळेत सुरक्षित बाहेर काढण्यात यश आल्याने मोठा अनर्थ टळला. या घटनेत रेस्टॉरंटच्या मालमत्तेचे काही प्रमाणात नुकसान झाले असून आग नेमकी कशामुळे लागली याचा सखोल तपास सध्या अग्निशमन विभाग आणि स्थानिक पोलीस करत आहेत. पर्यटन हंगामाच्या पार्श्वभूमीवर अशा घटना घडल्याने हॉटेल व्यावसायिकांनी सुरक्षेच्या नियमांचे पालन करणे किती गरजेचे आहे, हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Water Conservation: उधळपट्टी टाळू, उद्यासाठी पाणी वाचवू! गोव्याच्या जलसुरक्षेसाठी प्रत्येक थेंबाचा हिशेब हवा

संघातून बाहेर काढलं, तरी हार मानली नाही! जिद्द, मेहनतीच्या जोरावर जॅक कॅलिस बनला क्रिकेटविश्वातील महान अष्टपैलू; ठोकल्या 25,000हून अधिक धावा, घेतल्या 577 विकेट्स

Student Financial Assistance: गोमंतकीय विद्यार्थ्यांना सरकारची मोठी भेट! IIT, IIM, AIIMSमध्ये प्रवेश मिळाल्यास 1 लाखांची शिष्यवृत्ती

Rashi Parivartan Yog 2026: धनलाभ अन् प्रगतीचा योग! 'राशिपरिवर्तन योगा'ने 5 राशींच्या लोकांचे स्वप्न होणार पूर्ण; रातोरात चमकणार नशीब

Singer Death: मनोरंजन विश्वात खळबळ! रॉक संगीताचा दिग्गज काळाच्या पडद्याआड; फरहान अख्तर, विशाल ददलानी भावुक

SCROLL FOR NEXT