Canacona Mamledar Office Fire: Dainik Gomantak
गोवा

Canacona Fire: काणकोण मामलेदार कार्यालयातील आगीत अनेक जुने दस्तऐवज खाक; घटनेबाबत संशय

दस्तऐवजांमध्ये जमिनींच्या फेरफार नोंदींचा समावेश

गोमंतक ऑनलाईन टीम

Canacona Mamledar Office Fire: काणकोण येथील मामलेदार कचेरीत लागलेल्या आगीत अनेक जुने दस्तऐवज खाक झाल्याची माहिती आहे. ही आग फार मोठी नव्हती, मात्र महत्वाचे, जुने अनेक दस्तऐवज या आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याचे समजते. त्यावरून या घटनेबाबतच संशय व्यक्त केला जात आहे.

सोमवारी मध्यरात्री ही आग लागली होती. काही कर्मचारी रात्री ड्युटीवर होते. आगीवर नियंत्रण मिळवेपर्यंत बरेच दस्तऐवज जळून गेले होते. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. आगीच्या कारणांचा शोध घेतला जात आहे.

दरम्यान, या आगीबाबत संशय व्यक्त केला जात आहे. गेल्या काही काळामध्ये राज्यात जमिनी हडप करण्याचे प्रकार घडले आहेत. यातील काही प्रकरणांची चौकशी एसआयटीमार्फत केली जात आहे. एक सदस्यीय आयोगही या प्रकरणांची चौकशी करणार आहे.

त्या पार्श्वभुमीवर या आगीमध्ये येथील काही जमिनींची कागदपत्रे जळून गेली आहेत. या कागदपत्रांमध्ये फेरफार नोंदीची कागदपत्रे होती, असे समजते. फेरफार कागदपत्रांमधून जमिनीच्या मालकीचा इतिहास कळत असतो.

नेमकी हीच कागदपत्रे जळाल्याने या आगीबाबत संशय व्यक्त होत आहे. आग लागली की लावली गेली, जाणीवपूर्वक तर आग लावली गेली नाही ना, याचा तपास करावा, अशी चर्चा रंगली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT