अस्नोडा येथील अष्टगंधा अर्बन को.ऑप. क्रेडिट सोसायटी लिमिटेड शाखेचे व्यवस्थापक प्रकाश कांदोलकर यांनी अनेक ठेवीदारांची फसवणूक केल्याचा आरोप खातेदारांनी केला असून त्यांच्या विरुद्ध आर्थिक फसवणूक केल्याबद्दल एफआयआरची मागणी खातेदारांनी केली आहे. (Financial Fraud)
अष्टगंधा अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या अस्नोडा शाखेत मोठ्या प्रमाणात बचत आणि मुदत ठेवी खाती असून ठेवीदारांच्या ठेवी मॅच्युअर्ड झाल्याचे इथल्या ठेवीदारांचे म्हणणे आहे. मात्र सदर सोसायटीने आमची देणी अद्याप दिली नसून ते फक्त आश्वासने देत असल्याचा आरोप ठेवीदारांनी केला आहे.
ठेवीदारांचे असे म्हणणे आहे कि, या शाखेचे व्यवस्थापक गेल्या अनेक महिन्यांपासून ठेवीदारांना उलट-सुलट कारणे सांगून ठेवींची रक्कम देण्यापासून टाळाटाळ करत आहेत. हे प्रकार 2022 पासून वारंवार होत आहेत. तसेच या सहकारी सोसायटीचे पदाधिकारीही कोरोनाचे कारण सांगून ठेवींची रक्कम देण्यास टाळाटाळ करत आहेत.
ठेवीदारांचे असे म्हणणे आहे की, या सोसायटीचे अनेक कर्जदार कर्जाची परतफेड करण्यात अयशस्वी झाले आहेत. त्यामुळेच बुडीत कर्जांमध्ये वाढ झाली असून को-ऑप सोसायटीच्या एकूण ताळेबंदावर परिणाम झाला आणि नफ्यावर गंभीर परिणाम झाला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.