PF Account Dainik Gomantak
गोवा

PF Account: अखेर निवृत्त कर्मचाऱ्याला मिळाला न्‍याय

PF Account: ‘पीएफ’ला दणका : 20 वर्षे अडवून ठेवली पेन्‍शन; 25 हजारांची नुकसान भरपाई

दैनिक गोमन्तक

PF Account: आपल्‍या प्रोव्‍हिडंट फंड (पीएफ) खात्‍याचा नंबर व्‍यवस्‍थित दिला नाही अशी सबब पुढे करून एका निवृत्त कर्मचाऱ्याची मासिक पेन्‍शन तब्‍बल 20 वर्षे अडवून ठेवल्‍यामुळे राज्‍य ग्राहक तक्रार निवारण आयोगाने पीएफ आयुक्‍त कार्यालयाला दोषी ठरवून त्‍या कर्मचाऱ्याला पेन्‍शन मिळविण्‍यासाठी जो मन:स्‍ताप झाला त्‍याची भरपाई म्‍हणून 25 हजार रुपये देण्‍याचा आदेश दिला.

शिवाय खटला दाखल करण्‍यासाठी आलेल्‍या खर्चापोटी अतिरिक्‍त 15 हजार रुपये देण्‍याचेही निर्देश दिले आहेत.

सावईवेरे-फोंडा येथील गोपाळ सिनॉय सावईकर यांनी आयोगासमोर हा दावा दाखल केला होता. त्‍यापूर्वी त्‍यांनी उत्तर गोवा जिल्‍हा आयोगासमोर दावा पेश केला असता २०१८ साली या कर्मचाऱ्याच्‍या पेन्‍शनची सर्व रक्‍कम त्‍याला अदा केली असे कारण सांगून जिल्‍हा आयोगाने त्‍यांचा दावा फेटाळून लावला होता. त्‍यांनी या आदेशाला राज्‍य आयोगासमोर आव्‍हान दिले होते. नागेश कोलवाळकर आणि रचना गोन्‍साल्‍विस या द्विसदस्‍यीय आयोगासमोर हा आव्‍हान अर्ज सुनावणीस आला होता.

प्रकरणाची पार्श्वभूमी अशी

1 ‘नोवार्टीस’ या औषधी कारखान्‍यात काम करणारे गोपाळ सिनॉय सावईकर हे १९९७ साली सेवेतून निवृत्त झाले. त्‍यावेळी त्‍यांनी आपल्‍या पीएफ खात्‍यातून सर्व रक्‍कम काढली.

2 त्‍यांना दर महिन्‍याला ८०० रुपये पेन्‍शन सुरू करणे गरजेचे होते. मात्र त्‍यांनी आपल्‍या खात्‍याचा नंबर वेगळा दिला व ते खाते दुसऱ्याच्‍या नावावर असल्‍याचा दावा करून २०१८ पर्यंत त्‍यांना पेन्‍शनपोटी एकही पैसा दिला गेला नाही.

3 सावईकर यांनी उत्तर गोवा आयोगासमोर आपला दावा पेश केल्‍यानंतर पीएफ कार्यालयाने त्‍यांची थकीत असलेली पेन्‍शनची रक्‍कम अदा केली. त्‍यांची थकलेली रक्‍कम त्‍यांना मिळाल्‍यामुळे जिल्‍हा आयोगाने हा दावा निकाली काढला.

4 मात्र आपल्‍याला कुठल्‍याही प्रकारे नुकसान भरपाई मिळालेली नाही असा दावा करून त्‍यांनी या आदेशाला राज्‍य आयोगासमोर आव्‍हान दिले.

5 ज्‍यावेळी कर्मचारी निवृत्त होतो, त्‍यावेळी त्‍याच्‍या खात्‍यातील रक्‍कम देण्‍याबरोबरच अन्‍य बाबींचीही पूर्तता करणे ही पीएफ खात्‍याची जबाबदारी असते. ती पूर्ण करण्‍यास या कार्यालयाला अपयश आल्‍याचे नमूद करून २० वर्षे मन:स्‍ताप दिल्‍याबद्दल सावईकर यांना २५ हजारांची नुकसान भरपाई व १५ हजारांचा दाव्‍याचा खर्च देण्‍याचा आदेश दिला.

6 ही रक्‍कम ३० दिवसांत फेडण्‍यात यावी, असे आदेशात नमूद करण्‍यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Team India: "मी आत्महत्या करणार होतो", टीम इंडियाच्या स्टार खेळाडूचा धक्कादायक खुलासा; क्रिडाविश्वात खळबळ

Goa Accidental Deaths: ..अजून किती लोकांचे जीव जाणार? गोव्यात अपघाती बळींचे दीडशतक; 25 जुलैपासून सात जणांचे मृत्यू

Liquor Deaths Goa: गोव्यात दारूमुळे होतो 'इतक्या' लोकांचा मृत्यू, धक्कादायक आकडेवारी उघड; सर्वाधिक मृत्‍यू 41 ते 50 वयोगटातील

Amthane Dam: प्रतिक्षा कधी संपणार? 'आमठाणे धरण' अजूनही कोरडेच! गेट दुरुस्तीचे काम लांबणीवर

Ladli Laxmi Yojana: गावडेंकडून महिला-बाल कल्‍याण अधिकारी लक्ष्य, 'लाडली लक्ष्‍मी'च्‍या प्रलंबित अर्जांवरून अधिकाऱ्यांवर केले आरोप

SCROLL FOR NEXT