Oscar Martins Gomantak Digital Team
गोवा

Salcete News : कुंकळ्ळीचे बंड अभ्यासक्रमात; ‘चिफ्टन्स मेमोरियल’ला आनंद

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे मानले आभार

गोमन्तक डिजिटल टीम

Salcete : 1583 सालच्या कुंकळ्ळीतील बंडाची माहिती इयत्ता अकरावीच्या इतिहासाच्या पुस्तकात पाठाच्या रूपाने समाविष्ट केल्यामुळे कुंकळ्ळी चिफ्टन्स मेमोरियल ट्रस्टने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, विरोधी पक्ष नेते युरी आलेमांव, गोवा शालांत मंडळाचे आभार मानून आनंद व्यक्त केला आहे. जगभरातील इतिहासकार व संशोधकांनाही या माहितीच्या आधारे आणखी संशोधनाची संधी प्राप्त होईल, असे ट्रस्टचे अध्यक्ष ऑस्कर मार्टिन्स यांनी आज मडगावात घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

कुंकळ्ळी बंड 1583 चा धड्याच्या रुपाने अभ्यासक्रमात समावेश केल्याने त्याचा प्रभाव दीर्घकाळापर्यंत टिकणारा असेल. शिवाय युवकांना व भावी पिढीला या बंडाची माहिती मिळेल,असेही ते म्हणाले. यावेळी ट्रस्टी श्रीपाद देसाई व भिकू देसाई उपस्थित होते.

पोर्तुगीजांविरुद्धचे हे पहिले बंड होते. या वेळी कुंकळ्ळीकरांनी असहकार व सविनय कायदेभंगाची चळवळ पुकारली होती. याच प्रकारची चळवळ नंतर गांधीजींनी ब्रिटीशांविरोधात केली त्यामुळे या बंडाला अधिक महत्त्व प्राप्त झाल्याचे सांगण्यात आले.

अकरावीच्या या इतिहासाची माहिती देताना बंडाची कारणे, घटना व महत्व याची तंतोतंत माहिती देण्यात आल्याचे ट्रस्टतर्फे सांगण्यात आले. जी माहिती या धड्यात देण्यात आली आहे त्याबद्दल आम्ही समाधानी आहोत,असेही ट्रस्टतर्फे सांगण्यात आले. आम्ही लवकरच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेणार आहोत. त्यांनी आमच्या काही मागण्या मान्य केल्या आहेत. आमच्या आणखी पाच मागण्या त्यांना मान्य करण्यासाठी सांगणार असल्याचे मार्टिन्स म्हणाले.

मागण्या अशा

  • कुंकळ्ळी बंड 1583 बाबत माहितीपट तयार करावा.

  • स्मारकाचे नूतनीकरण व देखभाल करावी.

  • कुंकळ्ळीकरांना जमिनीचे मालकी हक्क द्यावेत.

  • कुंकळ्ळी बंड 1583 बद्दल जागृती करावी.

असोळणा येथील स्व. ज्युलिओ मिनेझिस यांना स्वातंत्र्यसैनिक म्हणून मान्यता देऊन त्यांच्या स्मारकाची देखभाल करणे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shravan 2025: श्रावण महिना सुरु होतोय, सर्व मनोकामना पूर्ण होतील! जाणून घ्या तिथी आणि शुभ योग कोणते?

Foreign Nationals Arrested: डिचोलीत बेकायदा वास्तव्य करणाऱ्या 2 परदेशी महिलांना अटक

Crime News: "तुझ्या पतीच्या स्पर्ममध्ये विष, माझ्यासोबत संबंध ठेव" पाद्रीचा उपचाराच्या नावाखाली लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न

Undertaker Viral Video: भारताचा अंडरटेकर! चिमुकल्या चाहत्याची एंट्री पाहून WWE प्रेमी थक्क, व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल, भारीच...

Vaibhav Sooryavanshi: रोहित, विराट, गावस्कर सोडा...'या' खेळाडूकडून मिळते वैभव सूर्यवंशीला जिद्द, चिकाटी आणि प्रेरणा; स्वतःच केला खुलासा

SCROLL FOR NEXT