Shivani and His Father Dainik Gomantak
गोवा

Goa Crime News: अखेर अनुरागच्या हाती पडल्या बेड्या; खुनाचा गुन्हा दाखल

Goa Crime News: हुंड्यासाठी पत्‍नी-सासूची हत्या : सहा दिवसांची पोलिस कोठडी

दैनिक गोमन्तक

Goa Crime News: दीड महिन्‍यापूर्वी संपूर्ण गोव्‍यात चर्चेचा विषय ठरलेल्‍या शिवानी राजवत आणि तिची आई जयदेवी सिंग चौहान यांच्‍या मृत्‍युप्रक़रणी वास्‍काे पोलिसांनी अखेर शिवानीचा पती अनुराग राजवत याच्‍या विरोधात खुनाचा गुन्‍हा नोंद केला.

शुक्रवारी रात्री उशिरा या प्रकरणी त्‍याला अटक करण्‍यात आली. या प्रकरणात वास्‍को पोलिसांनी अनुरागविराेधात हुंडाबळीचा गुन्‍हा नोंद केला होता.

शनिवारी त्‍याला न्‍यायालयात हजर केले असता, सहा दिवसांच्‍या पोलिस कोठडीचा रिमांड वास्‍को प्रथमवर्ग न्‍यायालयाने दिला. अनुराग राजवत याने आपली बहीण आणि आईचा जाणूनबुजून खून केला, असा आरोप शिवानीचा भाऊ शुभमसिंगने केला होता. शुभम हा मध्‍य प्रदेश पोलिस दलात काम करत

असून मध्‍य प्रदेशच्‍या पोलिस उपमहासंचालकांनी गोव्‍याच्‍या पोलिस महासंचालकांना लिहिलेल्‍या एका पत्रात या प्रकरणाची गंभीरपणे चौकशी करावी, अशी मागणी केली होती.

या प्रकरणात वास्‍को पोलिसांनी शिवानीची सासू साधना राजवत हिच्‍याविरोधात हुंडाबळीचा (३०४ ब) गुन्‍हा नोंद केला असून तिलाही अटक होण्‍याची शक्‍यता व्‍यक्‍त केली जात आहे. १८ नोव्हेंबर २०२३ रोजी ही दुर्घटना घडली होती.

नवेवाडे - वास्‍काे येथे एका फ्‍लॅटमध्ये झालेल्‍या गॅस गळतीच्‍या स्‍फाेटात शिवानी आणि तिची आई जयदेवी यांचा मृत्‍यू झाला होता. हुंड्याच्‍या लालसेपोटी नौदलात काम करणारा शिवानीचा पती अनुराग याने घराबाहेर जाताना गॅस मुद्दाम सुरू ठेवला. त्‍याचा स्‍फोट होऊन त्‍या दोघींचा मृत्‍यू झाला, असा पोलिसांचा दावा आहे.

अनुरागसोबत शिवानीचे दोन वर्षांपूर्वी लग्‍न झाले हाेते. त्‍यावेळी २० लाख रुपयांचा हुंडा मागितला होता. मात्र, शिवानीच्‍या घरच्‍यांनी फक्‍त १२ लाख रुपये दिले होते.

या एकाच कारणास्‍तव तिचा सासरच्‍या लोकांकडून छळ केला जात होता. त्‍यानंतर अनुराग पत्‍नी शिवानीला घेऊन गोव्‍यात आला. 18 नोव्‍हेंबर रोजी शिवानी व तिची आई मध्‍य प्रदेशला जाण्‍याच्‍या तयारीत असतानाच ही दुर्घटना घडली होती.

शिवानी गर्भवती होती आणि तिला त्रास होऊ नये, यासाठी तिची आई जयदेवी तिच्‍या मदतीसाठी गोव्‍यात आली होती. 18 नोव्‍हेंबर रोजी या दोघीही घरात असताना हा स्‍फोट झाला. नेमके त्‍याचवेळी शिवानीचा पती अनुराग घराबाहेर पडल्‍याने संशयाची सुई त्‍याच्‍याकडे वळली होती.

अनुरागने तपास भरकटवला : शुभम सिंग

अनुराग हा नौदलात काम करत असल्‍यामुळे आपल्‍या पदाचा गैरवापर करून त्‍याने या प्रक़रणाचा तपास भरकटवला, असा आरोप शिवानीचा भाऊ शुभमसिंग याने केला आहे. अनुराग हा नौदलात काम करत असल्‍यामुळे अशा तऱ्हेने स्‍फोट घडविता येतो,

याची त्‍याला माहिती होती. त्‍याने हा स्‍फोट घडवल्याने माझी आई आणि बहिणीचा जीव गेला. या प्रकरणात सुरुवातीलाच पोलिसांनी फाॅरेन्‍सिक तज्‍ज्ञांना बोलावून तपास करण्‍याची गरज होती. आता पोलिसांनी या चुका भरून काढाव्‍यात, असे शुभमसिंग म्हणाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Maza Flat Scheme: फ्लॅटधारकांनाही आता मिळणार मालकी हक्क, मुख्‍यमंत्र्यांकडून 'माझा फ्लॅट' योजनेची घोषणा

Horoscope: भाग्य उजळणार! शुक्रवारी वृषभसह 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार सुखाचे दिवस, आर्थिक चणचण होणार दूर

Delhi Restaurant Fire: दिल्लीत रेस्टॉरंटला लागलेल्या भीषण आगीत 21 जणांचा होरपळून मृत्यू VIDEO

1970 चा शांत गोवा अन् 2026 चा हा 'अशांत' अवतार; नक्की काय बदललं गोमंतकात?

अफगाणिस्तान मालिकेपूर्वी टीम इंडियाला 'बॅक टू बॅक' मोठा झटका, विराट पाठोपाठ आता 'हा' स्टार फलंदाजही जखमी; संघाला दुखापतीचं ग्रहण

SCROLL FOR NEXT