Goa Film City  Dainik Gomantak
गोवा

Film City Project : फिल्म सिटीला तीव्र विरोध; राज्यपाल, मुख्य सचिवांना निवेदन

Film City Project : लोलयेत जागृती, जागेला मंजुरी मिळाल्याने सरकारने या प्रकल्पासाठी सल्लागार नियुक्त करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Film City Project : काणकोण, लोलये पंचायत क्षेत्रातील कोमुनिदाद मालकीच्या जागेत प्रस्तावित फिल्म सिटी प्रकल्पाला स्थानकांचा विरोध वाढू लागला आहे. दरम्यान, विरोधकांनी वाड्यावाड्यांवर बैठका घेऊन याबाबत लोकजागृती करण्यास सुरवात केली आहे.

लोलये-पोळे कोमुनिदाद संस्थेच्या खास आमसभेत नियोजित फिल्म सिटीसाठी एंटरटेनमेंट सोसायटीला जमीन देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे.

भगवती पठारावरील २५० एकर जमीन या प्रकल्पासाठी संस्थेने एकमताने ठरवले आहे. जागेला मंजुरी मिळाल्याने सरकारने या प्रकल्पासाठी सल्लागार नियुक्त करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

दरम्यान, या प्रकल्पामुळे पर्यावरणीय समस्या तसेच पाणी, वीज समस्यांना स्थानिकांना तोंड द्यावे लागेल. यासाठी या प्रकल्पाला कोमुनिदाद संस्थेची जागा देऊ नये असे निवेदन राज्यपाल, मुख्य सचिव व कोमुनिदाद प्रशासकांना सादर केले आहे.

या संदर्भात शुक्रवारी लोलयेच्या जैवविविधता समितीचे अध्यक्ष दत्तप्रसाद ऊर्फ मनोज प्रभुगावकर यांनी सरपंच निशा च्यारी यांची भेट घेऊन या प्रकल्पाला विरोध करणारे निवेदन सादर केले.

प्रकल्पामुळे तोटाच : प्रभुगावकर

यासंदर्भात लोलयेच्या जैवविविधता समितीचे अध्यक्ष दत्तप्रसाद प्रभुगावकर यांना विचारले असता, या प्रकल्पाचा लोलये पंचायत क्षेत्रातील रहिवाशांना काहीच फायदा होणार नाही.

वीस हजार रोजगार निर्मिती होणार असल्याचे सांगण्यात येते मात्र सध्या फिल्मसिटीमध्ये काम करण्याची क्षमता असलेले नागरिक लोलये पंचायत क्षेत्रात एक हजार पेक्षा कमी असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे या प्रकल्पाचा लोलये पंचायत क्षेत्राला फायदा होण्याऐवजी सर्वच बाजूंनी तोटा होणार असल्याचा दावा त्यांनी केला.

पंचायतीकडे पत्रव्यवहार नाही : च्यारी

या संदर्भात सरपंच निशा च्यारी यांनी सांगितले की, फिल्म सिटीसंदर्भात अद्याप पंचायतीकडे संबंधित खाते वा सरकारने कोणताच पत्रव्यवहार केला नाही. त्यामुळे हा विषय पंचायत मंडळाच्या बैठकीत चर्चेला आला नसल्याचे त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT