ESG To Built Film City In Goa Dainik Gomantak
गोवा

Film City in Goa: खुशखबर! गोव्यात उभारणार फिल्मसिटी! एंटरटेन्मेंट सोसायटीतर्फे 250 एकर जागेचा शोध

माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकरांचे स्वप्न साकार होणार...

Akshay Nirmale

ESG To Built Film City In Goa: गोवा सरकारतर्फे राज्यात चित्रपट आणि मनोरंजन उद्योगासाठी पायाभूत सुविधा असलेली फिल्म सिटी उभारण्याचा मानस आहे. सरकारच्या अखत्यारीत असलेल्या एंटरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवा (ESG) या संस्थेमार्फत ही फिल्म सिटी उभारण्यात येणार आहे.

त्यासाठी अंदाजे 250 एकर जमिनीची आवश्यकता असणार आहे. या जागेचा शोध सध्या ESG मार्फत सुरू आहे.

दरम्यान, यासाठी जाहीरात देखील देण्यात आली आहे. आणि त्यातून टायटल क्लियर असलेल्या जमिनींसाठी नागरिक, संस्थांना आमंत्रण देण्यात आले आहे.

ईएसजीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, फिल्म सिटी उभारण्याचा प्रस्ताव प्राथमिक टप्प्यात असून यासाठी राज्यात सध्या जागेचा शोध सुरू आहे.

ईएसजीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून याबाबत बुधवारी स्थानिक वृत्तपत्रांमध्ये जाहिरात देण्यात आली आहे. त्यामध्ये खाजगी पक्षांकडून फिल्म सिटीसाठी जमिन मागण्यात आली आहे.

जाहिरातीत म्हटले आहे की, एंटरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवामार्फत राज्य सरकार राज्यात फिल्म सिटीसाठी उभारू इच्छिते. त्याच चित्रपट आणि मनोरंजन उद्योगासाठीच्या पायाभूत सुविधांचा विकास केला जाईल. त्यासाठी अंदाजे 250 एकर जमिन आवश्यक आहे.

टायटल क्लियर असलेल्या जमिनी, मालकी कागदपत्रांसह इच्छुक पक्षांनी ईएसजी किंवा अधिकाऱ्यांच्या OSD च्या कार्यालयाशी संपर्क साधावा. १० दिवसांत संपर्क साधावा, असेही जाहिरातीत म्हटले आहे.

ईएसजी ही सरकारी संस्था आहे, जी दरवर्षी गोव्यात इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया (IFFI) आयोजित करते. राज्यात चित्रपटाच्या शूटिंगसाठी सर्व परवानग्यांसाठी ही नोडल एजन्सी आहे.

ईएसजीचे विशेष कर्तव्य अधिकारी रोहित कदम यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले की, फिल्म सिटी उभारण्याचा प्रस्ताव प्राथमिक टप्प्यात आहे. एकदा प्रस्ताव योग्यरित्या तयार झाल्यानंतर आम्ही अधिक तपशील देऊ.

सध्या, आम्ही गोव्यात जागा शोधत आहोत. फिल्मसिटीची संकल्पना माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांनी मांडली होती, असे सूत्रांनी सांगितले.

सध्या सर्व केवळ विचारांच्या पातळीवर आहे. तथापि, यातील पहिली पायरी म्हणजे जमीन संपादन, त्या दृष्टीने जाहिरात देण्यात आली आहे, असे सूत्रांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: मंत्री, आमदारांचे कॉल रेकॉर्ड तपासा; सरकारी नोकरी घोटाळ्याप्रकरणी 'आप'ने सत्ताधाऱ्यांनाच घेरले

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa News Updates: कळंगुटमध्ये एफडीएची धडक कारवाई, निकृष्ट काजू जप्त; वाचा दिवसभरातील घडामोडी

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

SCROLL FOR NEXT