Mountain harvest Dainik Gomanatk
गोवा

हडफडे डोंगर कापणीप्रकरणी अधिकाऱ्यांवर येणार गंडांतर

निलंबनाची शक्यता: भूमाफियांच्या विरोधातील कारवाई आणखी तीव्र

दैनिक गोमन्तक

पणजी: हडपडे येथे मोठ्या प्रमाणात झाडांची तोड करून तसेच डोंगर कापून बेकायदा बांधकाम केले जात असल्याची तक्रार होती. याची वन खाते, शहर आणि नगर नियोजन खात्याच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली असता विविध कायद्यांचे उल्लंघन झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे हॉटेल पार्क रोजेस विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

या आठवड्यातील टीसीपीची ही सलग दुसरी कारवाई आहे. या प्रकरणात ‘पीडीए’चे अधिकारीही गुंतल्याचे समोर आल्याने त्यांच्या विरोधातही गुन्हे दाखल करण्यात येणार असून सोमवारी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता आहे. या कारवाईमुळे राज्यातील भूमाफिया आणि संबंधित अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

शहर आणि नगर नियोजन खात्याचा कारभार हातात घेतल्यानंतर मंत्री विश्‍वजीत राणे यांनी भूमाफियांच्या विरोधात जबरदस्त कारवाईचा बडगा उगारला आहे. हडपडे येथील पार्क रोजेस हॉटेलजवळ मोठ्या प्रमाणात डोंगर कापणी करून झाडांची तोडही सुरू असल्याची तक्रार गोवा फाऊंडेशनने केले होते. या घटनेची दखल मंत्री विश्‍वजीत राणे यांनी नगरनियोजन खात्याबरोबर वन खात्याच्या अधिकाऱ्यांना तपासणी करण्याचे आदेश दिले होते.

या कलमानुसार कारवाई

हडपडे येथील डोंगर कापणी प्रकरणात शहर आणि नगरनियोजन कायद्यातील अनेक कलमांचे उल्लंघन झाल्याचे स्पष्ट झाले. महत्त्वाचे म्हणजे कलम ‘17-अ’ चे उल्लंघन झाल्याचे स्पष्ट झाल्याने कंपनीच्या विरोधात कारवाई केली आहे. याशिवाय संबंधित पीडीएविरोधात कारवाई होणार आहे. गोवा वृक्षसंवर्धन कायदा 1984 कलम 8 चे उल्लंघन झाले असून मोठ्या प्रमाणात झाडे कापल्याचे स्पष्ट झाल्याने ही कारवाई केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Electricity: हायकोर्टाच्या 'शॉक'नंतर वीज विभागाला जाग, नवीन जोडणीसंदर्भात नियम होणार कठोर

Goa Baby Day Care Centre: नोकरदार पालकांसाठी खुशखबर! गोव्यात ९ ठिकाणी सरकारतर्फे पाळणाघर; केंद्रांची यादी, नियमावली वाचा

U19 Cooch Behar Trophy: द्विशतकी भागीदारीनं गोव्याला सतावलं, ॲरन-सिद्धार्थच्या शानदार खेळीच्या जोरावर हैदराबादनं गाठला मोठा टप्पा

Indian Super League 2024: ०-१ ने पिछाडीवर असलेल्या सामन्यात एफसी गोवाचं जबरदस्त कमबॅक, 'पंजाब'ला 'दे धक्का'

Goa Live Updates: २८ कोटीच्या इफ्फी खर्चाबाबत मुख्यमंत्र्यांनी खुलासा करण्याची गरज; आणि गोव्यातील काही रंजक बातम्या

SCROLL FOR NEXT