Goa police Dainik Gomantak 
गोवा

Goa News: कयाबुद्दिनवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करा!

नागरिकांची क्रांती मैदानावर निदर्शने

दैनिक गोमन्तक

फोंडा: राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याप्रकरणी फोंडा पोलिसांनी अटक केलेल्या कयाबुद्दिन अलीविरुद्ध राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी येथील क्रांती मैदानावर निदर्शने करताना देशप्रेमी नागरिकांनी काल (मंगळवारी) संध्याकाळी केली.

(File a case of sedition against Kayabuddin)

राज्यातील देशप्रेमी व धर्मप्रेमी संस्थांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. कयाबुद्दीनने राष्ट्रद्रोहाचा गुन्हा केला आहे. अशा प्रकारचे कृत्य करणाऱ्यावर कडक कारवाई झाली नाही तर भविष्यात मोठे गुन्हे घडतील, असे मत नागरिकांनी मांडले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी याप्रकरणी त्वरित लक्ष घालून कयाबुद्दीनवर कडक कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना द्यावेत, अशीही मागणी या प्रतिनिधींनी केली. बेकायदेशीरपणे लोकांना खोल्या देणाऱ्यांची कसून चौकशी करा आणि अशा लोकांना हुडकून काढा, अशी मागणी या प्रतिनिधींनी केली.

देशद्रोह्यांना शोधा

यावेळी परशुराम सेनेचे शैलेंद्र वेलिंगकर, गोमंतक मंदिर महासंघाचे जयेश थळी, राष्ट्रीय बजरंग दलाचे प्रतिनिधी नितीन फळदेसाई, केसरिया हिंदू वाहिनीचे राजीव झा यांनी विचार व्यक्त केले. देशद्रोही प्रकार खपवून घेऊ नका, त्यांना हुडकून काढा, अशी मागणी त्यांनी केली.

यापूर्वीही प्रकार

संशयित कयाबुद्दीन याने गेल्या वर्षीही असाच प्रकार केला होता; पण त्यावेळी माफी मागितल्याने प्रकरण मिटले होते. पण यावेळीही तोच प्रकार झाल्याने हे प्रकरण गंभीर असून कडक कारवाई हाच त्यावर उतारा आहे, असे या प्रतिनिधींनी सांगितले. यासंबंधीचे एक निवेदन फोंडा पोलिसांना दिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT