fishing Dainik Gomantak
गोवा

कुडतरी येथे मासेमारी वादावरून स्थानिक आणि शेतकरी यांच्यात हाणामारी

कुडतरी येथे शनिवारी ताजे मासेमारी करण्यावरून स्थानिक आणि शेतकरी यांच्यात चांगलीच हाणामारी झाली.

दैनिक गोमन्तक

मडगाव: कुडतरी येथे शनिवारी ताजे मासेमारी करण्यावरून स्थानिक आणि शेतकरी यांच्यात चांगलीच हाणामारी झाली. या ठीकाणी अनेक स्थानीक आणि शेतकरी वर्ग एकत्र आले आणि त्यांनी आरोप केला की रालोई-लेक टेनंट असोसिएशनने त्यांना 15 मे नंतर मासेमारी करण्याला विरोध केला. पुढे त्यांनी दावा केला आहे की गेल्या अनेक वर्षांपासून ही प्रथा सूरू आहे.

(Fighting between locals and farmers over fishing dispute at Curtorim)

प्रसारमाध्यमांशी बोलताना येथील एका स्थानिकाने माहिती दिलेल्या माहिती नूसार 15 मे नंतर स्थानिकांना तलावातील मासे पकडण्याची परवानगी देणे ही परंपरागत प्रथा होती. मात्र, यावेळी त्यांना रालोई-तलाव भाडेकरू संघटनेने परवानगी दिली नाही.

"15 मे रोजी लिलावाची प्रक्रिया झाल्यानंतर, असोसिएशनने मासे काढण्यासाठी तलावामध्ये प्रवेश नाकारला, सप्टेंबर महिन्यात लिलाव करणार असल्याचे," ते म्हणाले.

त्यांनी स्थानिक आमदार अॉलेक्स रेजिनाल्डो यांच्यावरही या समस्येचे निराकरण करण्यात अपयशी ठरल्याबद्दल आणि असोसिएशनची बाजू घेतल्याचे सांगीतले.

"मासे पकडण्यासाठी तलावात गेलेल्या आमच्या काही तरुणांना असोसिएशनच्या सदस्यांनी मारहाणही केली," असाही आरोप स्थानीकांनी केला.

या आरोपांवर प्रतिक्रिया देताना रालोई-लेक टेनंट असोसिएशनचे अध्यक्ष सेबी बॅरेटो म्हणाले की, शेतकऱ्यांच्या एका गटाने गेल्या तीन वर्षांपासून लिलाव करण्याऐवजी मत्स्यपालनाची जबाबदारी स्वीकारली आहे.

"वास्तविक, मासेमारीचे काम नियमित अंतराने तीन वेळा केले जाते. मात्र, यावेळी प्रजननासाठी पुरेसा वेळ मिळण्यासाठी आम्ही केवळ दोनदाच मासेमारीचे करू शकलो. तसेच स्थानिकांना मासेमारी न करू देण्याचा हा निर्णय घेण्यात आला आहे.

स्थानिक आणि शेतकर्‍यांच्या गटाला बाहेरील लोकांकडून लिलाव करण्याची जबाबदारी घेण्याची जुनी प्रथा पुढे चालवायची असेल, तर असोसिएशनची त्याला हरकत नाही, असेही ते म्हणाले.

“पुढील दोन दिवसांत स्थापन होणार्‍या नवीन समितीला निर्णय घेऊ द्या,” असे अध्यक्ष सेबी बॅरेटो म्हणाले

ते पुढे म्हणाले, "राज्यातील संबंधित अधिकाऱ्यांकडून कोणतीही मदत मिळत नसल्याने शेजारील राज्यांमधून मत्स्यपालनासंबंधीत संघटनांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे."

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sourav Ganguly Head Coach: दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय! सौरव गांगुली बनले नवे हेड कोच; 'दादा' आता 'DC'ला मिळवून देणार पहिली IPL ट्रॉफी?

Shadashtak Yog 2026: कामाच्या ठिकाणी वाद आणि आर्थिक फटका! जीवनात खळबळ माजवणार षडाष्टक योग; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठं तुफान

Gujrat Road Accident: भावनगरमध्ये रक्ताचा सडा! भरधाव बोलेरोची ट्रेलरला जोरदार धडक, 6 जणांचा मृत्यू; एकजण देतोय मृत्यूशी झुंज VIDEO

SIR Guidelines: 'एसआयआर'च्या मार्गदर्शक तत्त्वांना सुप्रीम कोर्टाची कायदेशीर मान्यता? निवडणूक आयोगाच्या वकिलांचा दावा; गोवा खंडपीठात आजही सुनावणी सुरु

Gaza Revenge Plot Exposed: गाझाचा बदला घेण्यासाठी रचला कट, फ्लाईदुबईच्या को-पायलटचा धक्कादायक खुलासा, म्हणाला, 'मला शहीद व्हायचे होते'

SCROLL FOR NEXT