Mahadayi Water Dispute | CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

Mahadayi River Dispute : शाहांच्या विधानावर CM सावंत यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, गोवेकर लवकरच...

दैनिक गोमन्तक

Mahadayi Water Dispute : केंद्रीय जलआयोगाने कळसा-भांडुराच्या सुधारित प्रकल्प आराखड्याला मंजुरी दिल्यामुळे राज्य सरकारला म्हादई नदीच्या पाणी प्रश्‍नाबाबत जोरदार झटका मिळाला असतानाच गोव्याच्या संमतीनेच म्हादई पाणी वाद मिटवला, असे अत्यंत वादग्रस्त आणि धक्कादायक विधान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी हुबळीतील सभेत केल्यामुळे गोव्यात एकच खळबळ उडाली आहे.

यावर गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी एक नवे विधान केले आहे. ते म्हणाले की, गोव्याचा म्हादईबाबतचा कायदेशीर लढा भक्कम असून याबाबत लवकरच गोवेकरांना परिणाम पाहायला मिळतील. त्यामुळे मी गोवेकरांना ही खात्री देतो की आमचे सरकार नक्कीच गोवेकरांचे हित जपणारे आहे.

मुख्यमंत्र्यांच्या या विधानामुळे पुन्हा एकदा नागरिकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. एकीकडे केंद्रस्तरावर असे बोलले जात आहे की, म्हादई वळवण्याचा निर्णय हा गोव्याच्या संमतीनेच घेतला गेला आहे; तर दुसरीकडे मुख्यमंत्री गोवेकरांना आश्वासनांवर आश्वासने देत आहेत.

नागरिकांनी नेमका विश्वास ठेवायचा तरी कशावर हाच मोठा प्रश्न आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत नाराज, गोवा विद्यापीठाचे मानांकन घसरल्यावरुन व्यक्त केली चिंता

Goa Today's News Live: अवजड वाहनांना अनमोड घाट खुला

Sahara Refund Cap: सहारामध्ये पैसे अडकलेल्या गुंतवणुकदारांना दिलासा, रिफंडबाबत सरकारने घेतला मोठा निर्णय

IIT चा माजी विद्यार्थी 700 कोटींची गुंतवणूक करणार; गोव्यात धावणार आणखी EV बसेस, मंत्रिमंडळाची मंजुरी

GPSC परीक्षा म्हणजे काय रे भाऊ? 50 टक्के विद्यार्थ्यांना नाही माहिती, Goa University च्या कामगिरीवर मुख्यमंत्री नाराज

SCROLL FOR NEXT