Davorlim Dainik Gomantak
गोवा

Davorlim : पेट्रोल पंपच्या परवानगीवरून दिकरपाली ग्रामसभेत हातघाई

स्थानिकांचा विरोध : सरपंच धावले विरोधकांच्या अंगावर

दैनिक गोमन्तक डिजिटल

पेट्रोल पंपला देण्यात येत असलेल्या परवानगीवरून आज दवर्ली-दिकरपाली पंचायतीच्या ग्रामसभेत प्रचंड गदारोळ झाला. पंपाला परवानगी देण्यास विरोध वाढल्याने सरपंच हेर्कुलान नियासो संतापले आणि थेट विरोधकांच्या अंगावर धावले. त्यामुळे ग्रामसभेत काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. अखेर काही कालावधीनंतर वातावरण निवळले.

ग्रामसभेच्या सुरुवातीला लोकांच्या मूलभूत प्रश्नांवर चर्चा झाली. खर्चाचे अंदाजपत्रकही संमत करण्यात आले. त्यानंतर पंचायतीतील पाच सदस्य श्याम राजाध्यक्ष, संतोष नाईक, विद्याधर आर्लेकर, संपदा नाईक आणि कार्मिनो कार्वाल्हो हे ग्रामस्थांमध्ये जाऊन बसले.

तेव्हा पंचायत क्षेत्रात पेट्रोल पंपला परवानगी देण्याचा विषय निघाला. खाली बसलेल्या पंचांनी व ग्रामस्थांनी या पेट्रोल पंपला परवानगी देऊ नये, असा हेका धरला.

ज्या जागेवर हा पेट्रोल पंप प्रस्तावित आहे, ती जागाच बेकायदेशीर आहे. पेट्रोल पंपसाठी कायदेशीर तसेच सरकारी मान्यताप्राप्त कागदपत्रे लागतात, ती नाहीत असे सर्वांनी सरपंचांना सांगितले. तेव्हा सरपंचांचा रागाचा पारा चढला.

त्यातच मनोज दुकळे नामक ग्रामस्थाने हा पेट्रोल पंप बेकायदेशीर कसा, याची कागदपत्रेच सादर केली. तेव्हा मात्र सरपंच उठले आणि त्यांच्या अंगावर धावून गेले.

तेव्हा इतरांनी त्यांना अडविले. नाही नाही म्हणता हे प्रकरण हातघाईवर आले. या पंचायत मंडळात एकूण 11 पंच आहेत. त्यातील सहा जणांचे बहुमत आहे.

घर क्रमांकाबाबत चर्चाच नाही

दवर्लीत शेतजमिनीवर जी बेकायदेशीर घरे बांधली आहेत व त्यांना घर क्रमांक देण्यावरून जो वाद सुरू आहे, त्यावर ग्रामसभेत चर्चा झालीच नाही.

या ग्रामसभेत हा मुद्दा प्रामुख्याने चर्चिला जाणार, अशी अनेकांची अपेक्षा होती. मात्र, एकाही सदस्याने या विषयाकडे लक्ष वेधले नाही. त्यामुळे काही ग्रामस्थांना याचे आश्चर्य वाटले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Flight Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

WWE News: 'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT