pernem 
गोवा

पंधरा दुचाकी जप्‍त, तिघांना अटक

Prakash Talvanekar

प्रकाश तळवणेकर

पेडणे :

पेडणे पोलिसांनी केलेल्या एका धडक कारवाईत दुचाक्या चोरणाऱ्या तीन युवकांना अटक केली. तसेच त्यांच्याकडून चोरलेल्‍या पंधरा मोटारसायकल ताब्यात घेण्यात आल्या. त्यातील काही मोटारसायकलचे महत्त्‍वाचे भाग काढून वेगळे केले आहे. अटक केलेल्यांमध्ये गॉर्डन आग्नेलो फर्नांडिस (१८ वर्षे, शिवोली बार्देश), सायमन ॲल्विन डिसोझा (२३ वर्षे, सुकूर बार्देश) व डेंझिल दुरात कारास्को (२९ वर्षे, करासवाडा) यांचा समावेश आहे. ताब्यात घेतलेल्या चोरीच्या मोटरसायकलींची किंमत २५ लाख ६० हजार रुपये एवढी आहे.

पेडणे पोलिस निरीक्षक संदेश चोडणकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, उपनिरीक्षक संजीत कांदोळकर हे काल आपल्या पोलिस सहकाऱ्यांसोबत गस्तीवर असताना त्यांना चोपडे येथे एक युवक संशयास्पदरित्या फिरत असताना आढळला. त्‍यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याची चौकशी सुरू केली असता त्याने आपले नाव गॉर्डन आग्नेलो फर्नांडिस (शिवोली) असे सांगितले. सायमन ॲल्विन डिसोझा हा सुकूर बार्देश येथील, तर करासवाडा म्हापसा येथिल डेंझिल कारास्को हे दोघेही राज्यातील विविध भागात मोटारसायकल चोरतात व आपणाला आणून विकतात. गॉर्डनने दिलेल्या माहितीच्या आधारे सायमन डिसोझा व डेंझिल कारास्को यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी आपण मोटारसायकलच्या चोऱ्या करतो याची कबुली दिली. त्‍यानंतर त्‍या तिघांकडून एकूण पंधरा मोटारसायकल ताब्यात घेतल्या.

जप्‍त केलेल्‍या दुचाकी

त्यात यामाहा आर एक्स १०० जीडीएच -१४२०, आर डी ३५० मोटारसायकल क्रमांक जीए ०२ - ई ९९४४ , आर डी ३५० मोटारसायकल क्रमांक ई ५४५५, हिरो होंडा सीडीआय क्रमांक जी ए ०३ - के - ०६३०, केटीएम मोटारसायकल, बजाज एनएस २०० क्रमांक जीए ०७ - जे - ९२४० असे क्रमांक आहेत. बाकीच्या मोटारसायकलवर क्रमांक नाहीत. यातील दोन मोटारसायकलचे भाग सुटे केलेल्या अवस्थेत सापडले आहेत. डेंझिल कारास्को याचे गॅरेज असून त्याला दुचाक्या दुरुस्तीचे काम येते. गॉर्डन स्वत:ही मोटारसायकलच्या चोऱ्या करीत होता, असेही उघड झाले आहे.

चोरीनंतर दुचाकींच्‍या सुट्या भागांची अदलाबदल

सायमन डिसोझा व गॉर्डन फर्नांडिस यांनी चोरून आणलेल्या मोटरसायकलचे भाग काढून एक दुसऱ्या मोटारसायकलना लावणे तसेच क्रमांक बदलण्याचे काम करायचा. जेणेकरून मोटारसायकल ओळखणे शक्य होणार नाही. तसेच बनावट कागदपत्रेही तयार करण्याचे काम तो करत होता. त्यामुळे या चोरट्यांकडून पकडलेल्या मोटारसायकलवर असलेले क्रमांक खरे की खोटे हे स्पष्ट झालेले नाही. डेंझिल कारास्को याला २०१४ मध्ये म्हापसा येथे सीआयडी गुन्हा अन्वेषण विभागातील तत्कालीन पोलिस निरीक्षक संदेश चोडणकर यांनी एका कार्यालयातील लॅपटॉप चोरून नेल्याप्रकरणी अटक केली होती.

दुचाक्या चोरी प्रकरणी पेडणे पोलिस निरीक्षक संदेश चोडणकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संजीत कांदोळकर, प्रफुल्ल प्रफुल्ल गिरी, विवेक हळर्णकर, हरिष वायंगणकर, कॉस्टेबल अनंत भाईडकर, रूपेश कोरगावकर, साबाजी राऊळ, महेश केरकर व संदीप गावडे यांनी या मोहिमेत भाग घेतला.

दुसरी घटना

ऑगस्ट २०१८ मध्ये पेडणे पोलिस ठाण्याचे निरीक्षक संदेश चोडणकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी दुचाकी चोरट्यांची एक टोळी गजाआड करून चोरलेल्या सतरा दुचाक्या ताब्यात घेतल्या होत्या. त्यानंतर दुचाकी चोरट्यांचा शोध लावून चोरीला गेलेल्या दुचाक्या एवढ्या मोठ्या प्रमाणात ताब्यात घेण्याची दुसरी घटना आहे.

- महेश तांडेल

Goa Goa Goa

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pilgao Farmers Protest: पिळगावात तिसऱ्या दिवशीही ‘रस्ता बंद’; खाण कंपनीच्या भूमिकेकडे ग्रामस्थांचे लक्ष

Cooch Behar Trophy: गोव्याकडे निर्णायक आघाडी! कर्णधाराचे झुंझार शतक; आता लक्ष गोलंदाजांच्या कामगिरीवर

Vidhu Vinod Chopra At IFFI: 'माझ्या सिनेमाच्या पहिल्या 'शो'ला चार-पाचच प्रेक्षक होते..'; चोप्रांनी सांगिलता 'खामोश'चा दिलखुलास किस्सा

Paroda Murder Case: पारोड्यात महिलेचा अज्ञाताकडून खून! संशयित कामगाराचा शोध सुरू

एकाच दिवशी Cash For Job मधील ठकसेनांना जामीन! तक्रारदारांची मात्र चिंता संपेना

SCROLL FOR NEXT