रोहन खंवटे
रोहन खंवटे  Dainik Gomantak
गोवा

‘फायबर टू होम’ कनेक्टिव्हिटी लवकरच: रोहन खंवटे

दैनिक गोमन्तक

पणजी: राज्यातील शहराबरोबरच ग्रामीण भागात इंटरनेट कनेक्टिव्हिटीची मोठी समस्या आहे. कोविड काळात ही समस्या जाणवली आहे. वीज व पाणी कनेक्शनप्रमाणेच आता इंटरनेट कनेक्शन प्रत्येक घरामध्ये पोहचणे गरजेचे आहे. त्यामुळे लवकर ‘फायबर टू होम’ प्रकल्प राज्यात सुरू करून प्रत्येक घराघरांत ही कनेक्टिव्हिटी देण्याचा प्रयत्न राहणार असल्याची माहिती माहिती तंत्रज्ञान मंत्री रोहन खंवटे यांनी आज दिली.

फायबर टू होम कनेक्टिव्हिटी प्रकल्पाला उशीर झाला आहे. त्याचा पूर्णपणे आढावा घेऊन त्याची पुन्हा शिफारस केली जाईल. संबंधित अधिकाऱ्यांशी पुढील आठवड्यत यासंदर्भात बैठक घेतल्यानंतरच राज्यातील कनेक्टिव्हिटीची स्थिती व या प्रकल्पाचा स्थिती याची माहिती कळल्यावर पुढील पावले उचलण्यात येतील. राज्यात कनेक्टिव्हिटीची समस्या असल्याचे मान्य करून मंत्री खंवटे म्हणाले, भाजप सरकारने मोबाईल टॉवर धोरणाची अंमलबजावणी झाल्यानंतर कनेक्टिव्हिटीसंदर्भातील सर्व प्रश्‍न सोडविले जातील. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मागील सरकारमध्ये या धोरणाचा मसुदा उपलब्ध केला होता. त्यामध्ये सरकारी इमारतींचा वापर मोबाईल टॉवर उभारण्यासाठी करण्याचे ठरले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao News : जनाधार कमी झाल्‍यानेच फळदेसाईंचे आरोप; सावित्री कवळेकर यांचा दावा

Siolim Water shortage : सागर उशाला; तरी कोरड पडलीय घशाला! आसगाव, शापोरावासीयांची व्यथा

Panaji News : पाटकर यांनी माफी मागावी; आमोणकरांची मागणी

Bicholim Factory Explosion : डिचोलीतील दुर्घटना; कारखान्यात सलग चार स्फोट

Video: मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईदने पुन्हा ओकली गरळ; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल!

SCROLL FOR NEXT