Ferry service Dainik Gomantak
गोवा

Ferry Service: फेरीसेवा सक्षम करणार- फळदेसाई

फळदेसाई: रो-रो फेरीबोटी सुरु करण्याचा प्रस्ताव

गोमन्तक डिजिटल टीम

Ferry Service राज्यातील फेरीसेवा सक्षम करण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरु असून, लवकरच 'रो-रो' फेरीसेवा सुरु करण्याची संकल्पना आहे, असे नदी परिवहन खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई यांनी सांगितले. डिचोलीत शुक्रवारी आयोजित 'प्रशासन तुमच्या दारी' या कार्यक्रमावेळी आले असता मंत्री फळदेसाई यांनी ही माहिती दिली.

विविध जलमार्गावर वाहतूक करणाऱ्या काही पारंपरिक फेरीबोटींवर वाहतुकीचा प्रचंड ताण येत असून, बऱ्याचदा गोंधळ आणि वादही निर्माण होत असतात. या प्रकारांवर नियंत्रण आणण्यासाठी 'रो-रो' फेरीसेवा सुरू करण्याची सरकारची संकल्पना आहे.

'रो-रो'फेरीबोटी खर्चीक असल्या, तरी येत्या सहा महिन्यात प्रायोगिक तत्त्वांवर दोन 'रो-रो' फेरीबोटी सुरू करण्यात येणार आहेत. ही संकल्पना यशस्वी ठरल्यास आणखीनही रो-रो फेरीबोटी आणण्यात येईल.

अशी माहितीही सुभाष फळदेसाई यांनी देऊन, 'रो-रो'मुळे जलमार्गावरील वाहतुकीचा ताण कमी होतानाच प्रवाशांना चांगली सेवा आणि त्यांचा वेळ वाचण्यास मदत होणार आहे. असा विश्वास व्यक्त केला. देवदेवतांची भूमी असलेला डिचोली हा भाग हा सुंदर पट्टा आहे. त्यामुळे चोडण-रायबंदर जलमार्गावर 'रो-रो' फेरीसेवा सुरू करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Pune Flight: हवेतील थरार! गोवा - पुणे विमानाच्या खिडकीची फ्रेम निखळली; धक्कादायक Video Viral

Modi Traffic Challan: ‘मोदीजी वाहन दंड भरा...’, सोशल मीडियावरील व्हायरल पोस्ट चर्चेत

IND Vs ENG: जयस्वालची दमदार खेळी! 'मुंबईच्या राजाचा' मोडला रेकॉर्ड; सेना देशात केला मोठा कारनामा

Corona Vaccine: कोविड लस घेतल्यानंतर हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होतो का? ICMR, NCDC चा अहवालातून केले स्पष्ट

Viral Video: 60 सेकंदात साधला डाव...! मेहनतीने घेतलेली 'क्रेटा' चोरट्यांनी पळवली; धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद

SCROLL FOR NEXT