Goa Tourism Dainik Gomantak
गोवा

Goa Tourism: गोव्याला फेणी पर्यटनाचा पर्याय

राज्यापुढे फेणी पर्यटनाला (Goa Tourism) चालना देण्याचा पर्याय आहे. जगात केवळ गोव्यातच काजुच्या बोंडापासून मद्यार्क काढला जातो,

Dainik Gomantak

पणजी: राज्यापुढे फेणी पर्यटनाला (Feni Tourism) चालना देण्याचा पर्याय आहे. जगात केवळ गोव्यातच काजुच्या बोंडापासून मद्यार्क काढला जातो, याकडे फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई (Vijay Sardesai) यांनी सरकारचे लक्ष वेधले. अर्थसंकल्पीय चर्चेत सहभागी होताना ते म्हणाले, फेणी हे‌‌ गोव्याचे वैशिष्ट्य आहे त्याचे संरक्षण केले गेले पाहिजे. जसे शॅंपेन विशिष्ट भागातच तयार केली जाते तशी काजुची फेणी गोव्यातच केली गेली पाहिजे.त्यासाठी केवळ भौगोलिक मानांकन देऊन चालणार नाही तर अॅपेलेशन मिळवले पाहिजे.

कोविड महामारीत गोवा ठप्प होता पण नगरनियोजन खाते सुरू होते. महामारीत हडफडे, पर्राचा बाह्य विकास आराखडा मंजूर करण्यात आला. दोन शहरे जन्माला घालण्यात आली. आता दक्षिण गोवा नगर नियोजन प्राधिकरण नवा आराखडा करणार आहे. एक आराखडा तयार करून दोनच वर्षे झाली आहेत. १० वर्षांसाठी तो आराखडा आहे हे लक्षात ठेवावे, असे ते म्हणाले. समाज शेती प्रकल्पाच्या फाईल‌ गायब अशा झाल्या अशी विचारणा करून ते म्हणाले सेंद्रिय शेतीचा पुरस्कार करणारे मंत्री रासायनिक खते वाटतात हे चालणारे नाही. आग्वाद येथील ऐतिहासिक तुरुंग सुशोभित करून ३० ‌वर्षांसाठी भाडे पट्टीवर देण्याचा प्रयत्न आहे. सत्ताधारी नेत्याचा मुलगा त्यात आहे अशी माहिती आहे. स्मार्ट सिटिचे तीन वर्षे ऑडिट झालेले नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UP Pension Hike: 1.21 कोटी पेन्शनधारकांसाठी खूशखबर! पेन्शनमध्ये होणार घसघशीत वाढ; 'या' राज्य सरकारचं मोठं गिफ्ट

Budh Gochar 2026: करिअर आणि संपत्तीत मोठी झेप! बुध गोचरचा महाचमत्कार; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT