Goa Crime News Dainik Gomantak
गोवा

Goa Murder Case: बायको सतत प्यायची दारु! मुंगुल फातोर्डा येथे पतीने पत्नीचा खून का केला?

Goa Crime News: करिष्मा आणि कृष्णा यांच्यात नेहमी खटके उडत असत. दरम्यान, यातूनच पतीने पत्नी करिष्माचा खून केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला.

Pramod Yadav

मडगाव: पतीने पत्नीचा खून केल्याची घटना बुधवारी (३० एप्रिल) मुंगुल - फातोर्डा येथे उघडकीस आली. याप्रकरणी पती कृष्णा रॉय (३८) याला अटक करुन सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. कृष्णाने पत्नी करिष्माचा खून का केला? याप्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे.

मूळ पश्चिम बंगाल येथील रॉय दाम्पत्य मुंगुल - फातोर्डा येथे वास्तव्यास होते. बुधवारी रात्री करिष्मा रॉय येथील घरात मृतावस्थेत आढळून आला. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला. तपासाअंती पोलिसांनी पतीला अटक केली. करिष्मा आणि कृष्णा यांच्यात नेहमी खटके उडत असत. दरम्यान, यातूनच पतीने पत्नी करिष्माचा खून केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला.

याप्रकरणात आता नवी माहिती समोर आली असून, पत्नी करिष्मा सतत मद्यपान करायची यामुळे पती कृष्णा कंटाळला होता. यातूनच कृष्णाने करिष्माला मारहाण केली यातच तिचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी संशयित पतीला अटक करुन न्यायालयात हजर केले असता त्याला सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

मिळालेल्या अधिकच्या माहितीनुसार, संशयित पती गोव्यात सुतारकाम करतो. पत्नीच्या सततच्या मद्यपानाला कंटाूळून त्याने बुधवारी रात्री तिला बेल्ट आणि काठीने मारहाण केली. यात गंभीर जखमी झालेल्या करिष्मा रॉय (२८ हिचा मृत्यू झाला, असे तपासातून समोर आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

SCROLL FOR NEXT