Sattari Village Flood | Goa Monsoon Update संग्रहित छायाचित्र
गोवा

संततधारेमुळे वाढली सत्तरीत पुराची भीती

म्हादईच्या पातळीत वाढ : नदीकाठच्या रहिवाशांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

दैनिक गोमन्तक

वाळपई (Valpoi) : सत्तरी तालुक्यात सध्या संततधार पावसाचे थैमान सुरूच असून हवामान खात्याने उद्या शुक्रवारपासून रेट अलर्ट जारी केल्याने सत्तरीवासीयांत महापुराची भीती वाढली आहे. म्हादई (Mhadai) नदीकाठच्या लोकांनी सावध रहाण्याची गरज आहे.

सत्तरी तालुक्याला 2019, 2020, 2021 साली सलग तीन वर्षे प्रलंयकारी महापुराचा मोठा फटका बसला होता. त्यामुळे यंदा चौथ्यावेळीही तीच स्थिती उद्‍भवेल,अशी भीती लोक मनात बाळगून आहेत. (Goa Latest News in Marathi)

सध्या पावसाने जोर पकडलेला असून पैकुळच्या पदपुलावरुन पाणी वाहू लागले आहे. म्हादईच्या पातळीत वाढ होऊन पाणी रस्त्यावर, बागायतीत, शेतात घुसले, असे प्रकार कधीच झाले नव्हते. पण सलग तीन वर्षे पुराचा फटका लोकांना बसला आहे.

आत्ताच पूर का येतो, यावर मतमतांतरे आहेत. म्हादई पात्रातील लहान बंधारे व त्यात वाहून येणारे ओंडके, गाळ यामुळे पूर येतो,असे काहींचे मत आहे. तर कर्नाटकने (Karnataka) बांधलेल्या कळसा भांडूरा धरण, कालव्याचे पाणी पावसावेळी सोडले जाते, असेही काहींचे मत आहे. (Goa Monsoon Updates)

पुराच्या आठवणी अजूनही ताज्या !

सलग तीनवर्षे जुलै, आॅगस्टमध्ये महापुराचा सामना सत्तरी तालुक्याला करावा लागला आहे. त्यात शेती, बागायती पिके पूर्णपणे नष्ट झाली होती. अनेकांची घरे कोसळली होती. म्हादईच्या किनारी भागात सोनाळ, कडतरी, सावर्डे, कुडशे, वेळगे, खडकी, सावर्शे, तार, भिरोंडा, पाडेली, गुळेली, गांजे या पूर्ण पट्ट्यात महापूराचा फटका बसला होता.

सोनाळ, कडतरी गावांचा संपर्क तुटला होता. त्या आठवणी अजूनही ताज्या आहेत. गतवर्षी म्हादई नदीला मोठा पूर आल्याने नदीचे पाणी लोकांच्या बागायतीत, घरांत घुसले होते. वाळपईचा नाला, वेळुस नदी दुथडी भरून वाहत होती. सर्वत्र हाःहाकार माजला होता. (Sattari village flood news)

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Electricity: हायकोर्टाच्या 'शॉक'नंतर वीज विभागाला जाग, नवीन जोडणीसंदर्भात नियम होणार कठोर

Goa Baby Day Care Centre: नोकरदार पालकांसाठी खुशखबर! गोव्यात ९ ठिकाणी सरकारतर्फे पाळणाघर; केंद्रांची यादी, नियमावली वाचा

U19 Cooch Behar Trophy: द्विशतकी भागीदारीनं गोव्याला सतावलं, ॲरन-सिद्धार्थच्या शानदार खेळीच्या जोरावर हैदराबादनं गाठला मोठा टप्पा

Indian Super League 2024: ०-१ ने पिछाडीवर असलेल्या सामन्यात एफसी गोवाचं जबरदस्त कमबॅक, 'पंजाब'ला 'दे धक्का'

Goa Live Updates: २८ कोटीच्या इफ्फी खर्चाबाबत मुख्यमंत्र्यांनी खुलासा करण्याची गरज; आणि गोव्यातील काही रंजक बातम्या

SCROLL FOR NEXT