FDA Action At Mapusa Bus Stand Dainik Gomantak
गोवा

FDA Goa: म्हापशात 510 किलो पनीरसह कांदा जप्त; एफडीएकडून दुसऱ्यांदा कारवाई

FDA Action At Mapusa Bus Stand: काही दिवसांपूर्वी देखील अन्न आणि औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी म्हापसा बस स्थानक येथे कारावाई केली होती.

Pramod Yadav

आंतराज्य बससेमधून येणाऱ्या खाद्यपदार्थाच्या वाहतुकीवर कडक कारवाई करताना, अन्न व औषध प्रशासनाने आज मंगळवारी म्हापसा नवीन बसस्थानकावर सरप्राईज मोहीम राबवली.

ज्यात 510 किलो पनीर, काही प्रमाणात दही तसेच 60 किलो फ्राईड ऑनियन जप्त केला. महाराष्ट्रातील ठाणे येथून हा पनीर आलेला होता. हा संपूर्ण मुद्देमाल 01 लाख रुपयांचा होता.

प्राप्त माहितीनुसार, मंगळवारी (ता.02) सकाळी 07 च्या सुमारास एफडीए अधिकारी रिचर्ड नोरोन्हा, राजाराम पाटील, शैलेश शेणवी तसेच सहकारी कर्मचाऱ्यांच्या पथकाने म्हापसा आंतरराज्य बसस्थानकावर येणाऱ्या वाहनांची तपासणी मोहीम राबवली.

FDA Action At Mapusa Bus Stand

या अधिकाऱ्यांनी अन्नपदार्थांची गुणवत्ता तपासण्यासाठी आंतरराज्य बसमधून वाहून नेले जाणारे खाद्यपदार्थ पार्सल तपासले.

दही पिशव्यांवर उद्याची पॅकिंग तारीख

पनीर कुठलेही लेबल (माहिती) लावलेले नसताना ठाणे, महाराष्ट्रमधून आणण्यात आला होता. तसेच दही, आणि 60 किलो ग्रॅम भाजलेला कांदा याचा समावेश होता. विशेष म्हणजे दही पिशव्यांवर पॅक तारीख उद्याची (03 जुलै) अशी नमूद केलेली होती.

हा मुद्देमाल जप्त करून म्हापसा पालिकेच्या सहाय्याने तो नष्ट करण्यात आला. दुधाचे पदार्थ येणार आहे, अशी एफडीएला टीप मिळाली होती

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT