Mapusa FDA Raid Dainik Gomantak
गोवा

Mapusa FDA Raid: नागरीकांच्या जीवाशी खेळ, कृत्रिम पद्धतीने केळी पिकवणाऱ्याला रंगेहाथ पकडलं, 'एफडीए'कडून 1 टन साठा नष्ट

FDA Raid: राज्यात अन्न व औषध प्रशासन विभाग (FDA)कडून अन्नसुरक्षाबाबत काटेकोर अंमलबजावणी जोरदार सुरू असून, गेल्या काही दिवसांपासून विविध ठिकाणी धडक कारवाया केल्या जात आहेत.

Sameer Amunekar

म्हापसा: राज्यात अन्न व औषध प्रशासन विभाग (FDA)कडून अन्नसुरक्षाबाबत अंमलबजावणी जोरदार सुरू असून, गेल्या काही दिवसांपासून विविध ठिकाणी धडक कारवाया केल्या जात आहेत. शनिवार (२६ एप्रिल) रसायनमिश्रित केळी पिकवणाऱ्या म्हापसा येथील मेसर्स प्रसाद फ्रुट्‌सच्या बसवंत बर्मनवार याला अन्न व औषध प्रशासन विभागाच्या (एफडीए) पथकाने शनिवारी रंगेहाथ पकडले. जप्त केलेली एक टन दूषित केळी या पथकाने नष्ट केली.

एफडीएचे रिचर्ड नोरोन्हा, राजाराम पाटील, अमित मांद्रेकर व लेनीन डीसा यांचा या तपास पथकासात समावेश होता. संचालक स्मिता देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या एफडीएचे पथकाचे म्हापसा परिसरात जोरदार मोहीम राबविली आहे.

काही दिवसांपूर्वी रसायनमिश्रीत केळी जप्त केली होती. काल बर्मनवार याला एथापोन रसायनामध्ये केळी बुडवताना एफडीच्या पथकाने रंगेहाथ पकडण्यात आले. सुमारे एक टन रसायनमिश्रीत केळी पथकाने नष्ट केली. त्याशिवाय बर्मनवार याच्यावर त्याच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

अन्न व औषध प्रशासन विभागाने अन्न सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. विभागाने या प्रकारच्या कृतींवर त्वरित आळा घालण्यासाठी कडक निरीक्षण आणि तपासणी सुरू केली आहे.

एफडीएनं याआधी, बार्देश आणि पेडणे तालुक्यात तीन अन्न विक्री आस्थापनांवर एफडीएने छापे टाकले होते. या कारवाईदरम्यान एका रेस्टॉरंटमध्ये धक्कादायक बाब समोर आली. संबंधित रेस्टॉरंटकडे एफडीएचा बनावट परवाना असल्याचे निदर्शनास आले होते.

यानंतर एफडीए अधिकाऱ्यांकडून रेस्टॉरंटला टाळं ठोकण्यात आले होते. यासोबतच ३० हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mumbai-Goa Highway वर भीषण अपघात! भरधाव कारनं दोन अल्पवयीन मुलींना उडवलं, दोघींचीही प्रकृती गंभीर Watch Video

'धुरंधर' स्टाईल फायरींगनं हादरला पाकिस्तान! जैश-ए-मोहम्मदच्या बड्या कमांडरचा खेळ खल्लास; अज्ञात बंदूकधाऱ्यांनं काढला काटा VIDEO

VIDEO: जखमी चेहरा, पाठीवर रडणारी बहीण, पुराचा हाहाकार! नेपाळमधील 'तो' 50 सेकंदांचा व्हिडिओ व्हायरल; तुमचेही पाणावतील डोळे

नो बॉलनंतर 'फ्री हिट' नको, गोलंदाजाला दंड ठोठवावा! सुनील गावसकरांची मोठी मागणी

Terrorist Secret Communication: गुप्त संवादासाठी अश्लील संकेतस्थळांचा वापर, दहशतवाद्यांची नवीन कार्यपद्धती; सोशल मीडियाला शोधला नवीन पर्याय

SCROLL FOR NEXT