Farsan Dainik Gomantak
गोवा

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर FDA अ‍लर्ट मोडवर, म्हापशात निकृष्ट दर्जाचे फरसाण जप्त

Goa FDA: एफडीएच्या टीमने करासवाडा- म्हापसा येथे छापा टाकून वरील फरसाण जप्त केले.

गोमन्तक डिजिटल टीम

म्हापसा: अन्न व औषध खात्याकडून करासवाडा- म्हापसा येथे भाडोत्री जागेत 'एफएसएसएआय' परवाना नसलेल्या खाद्यपदार्थ निर्मिती करणाऱ्या युनिटमधील निकृष्ट दर्जाचे फरसाण जप्त करण्यात आले.

Farsan

हा मुद्देमाल १ लाख रुपयांचा असून, या जागेत पाणी व वीज कनेक्शन नव्हते. याशिवाय स्वच्छतेबाबतही काळजी घेतली नव्हती. मंगळवारी (ता.२७) दुपारी एफडीएच्या टीमने या जागेत छापा टाकून वरील फरसाण जप्त केले.

आगामी गणेशचुतर्थी सणाच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध खात्याकडून अशाप्रकारे अन्नपदार्थ तयार करणाऱ्या जागांची पाहणी केली जात आहे. मागील काही दिवसांपासून या विक्रेत्याच्या मागावर एफडीएची टीम होती.

हे फरसाण निर्मिती करणारा विक्रेता पॅकेटमध्ये फरसाण बांधून लहान विक्रेत्यांना विकायचा. या पॅकेटवर आवश्यक माहिती असलेले लेबल्स नव्हते. जप्त केलेल्या मालात विविध प्रकाराचे फरसाण व शेव यांचा समावेश होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cristiano Ronaldo: सुपरस्टार 'रोनाल्डो' खेळणार गोव्यात? चाहत्यांचे AFC लीगकडे लक्ष; FC Goa च्या गटात येण्याची आतुरता

Vote Chori: पत्ता नेपाळींचा, राहतात भलतेच! गोवा काँग्रेसची घराघरांत जाऊन पडताळणी; बोगस मतदारांची पोलखोल

Rashi Bhavishya 15 August 2025: कुटुंबात प्रेम वाढेल, आर्थिक स्थैर्य टिकवण्यावर भर द्या; महत्त्वाचे करार यशस्वी होतील

Independence Day Wishes in Marathi: बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो... स्वातंत्र्य दिनानिमित्त मित्रपरिवाराला पाठवा 'या' देशभक्तीभर शुभेच्छा

Betalbatim Beach: आधी जीवरक्षकाशी वाद घातला, पण त्याच 'जीवरक्षका'ने वाचवला जीव; बेताळभाटी किनाऱ्यावर पर्यटकाची बेफिकिरी!

SCROLL FOR NEXT