FDA raid in Goa before Ganesh Chaturthi 2026 Dainik Gomantak
गोवा

FDA Raid: गणेश चतुर्थीपूर्वी 'एफडीए'ची मोठी कारवाई! मडगाव, केपे, धारबांदोड्यात तब्बल 430 किलो अन्नसाठा नष्ट

FDA Goa Food Inspection Ganesh Chaturthi: अन्नपदार्थांवर आवश्यक लेबल, उत्पादन व वापरण्याची अंतिम तारीख तसेच ‘एफएसएसएआय’ परवाना क्रमांक नसल्याचे तपासणीत आढळून आले.

गोमंतक ऑनलाईन टीम

मडगाव: आगामी चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) दक्षिण गोवा पथकाने केलेल्या तपासणी मोहिमेत सुमारे ४३० किलो वजनाचा, ८५ हजार ८८० रुपये किमतीचा अन्नसाठा नष्ट करण्यात आला. अन्नपदार्थांवर आवश्यक लेबल, उत्पादन व वापरण्याची अंतिम तारीख तसेच ‘एफएसएसएआय’ परवाना क्रमांक नसल्याचे तपासणीत आढळून आले.

पुण्याहून गोव्यात आणलेल्या बर्फाच्या एका पार्सलवरही चुकीची माहिती आढळली. पुण्यात उत्पादित झालेल्या या बर्फावर गोव्यातील उत्पादन केंद्राचा एफएसएसएआय परवाना क्रमांक नमूद करण्यात आला होता. त्यामुळे ग्राहकांची दिशाभूल होण्याची शक्यता असल्याने २०० किलो बर्फाचा, १२ हजार रुपये किमतीचा साठा नष्ट करण्यात आला.

दरम्यान, मडगाव येथील कदंब बसस्थानकावर आज एफडीएच्या पथकाने आंतरराज्य बसमधून वाहतूक होणाऱ्या खाद्यपदार्थांची तपासणी केली. एका बसमध्ये सुमारे २३ किलो खाद्यपदार्थ आढळले. या पदार्थांवर ‘एफएसएसएआय’च्या नियमानुसार आवश्यक लेबल नव्हते. याच

बसमध्ये सुमारे ३० किलो बटाट्याचे चिप्स आढळले. ९ हजार रुपये किमतीच्या या साठ्यावर उत्पादन व वापरण्याची अंतिम तारीख तसेच ‘एफएसएसएआय’ परवाना क्रमांकाची योग्य नोंद नव्हती.

अन्य ठिकाणची कारवाई

शिरवई-केपेतील एका उत्पादन केंद्राच्या तपासणीत ४५ हजार रुपये किमतीचा १५० किलो कलाकंद आढळला. त्यावर आवश्यक लेबल, बॅच क्रमांक आणि वापरण्याची अंतिम तारीख नव्हती. तसेच त्यात हिरवा रंग मिसळल्याचे आढळले.

शेल्डे - केपे येथील आणखी एका उत्पादन केंद्रातून ११ हजार ८८० रुपये किमतीचा २७ किलो मावा आढळला. या साठ्यावर आवश्यक लेबल व एफएसएसएआय परवाना क्रमांक नव्हता. त्यात रंग मिसळल्याचेही आढळले.

धारबांदोडा तालुक्यातही तपासणी मोहीम राबवून विविध मिठाईचे १५ नमुने घेण्यात आले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT