Indian Super League Football Dainik Gomantak
गोवा

Indian Super League: एफसी गोवासमोर बलाढ्य मुंबई सिटीचा अडथळा

Indian Super League: दहाव्या मोसमात सलग बारा सामने अपराजित राहिल्यानंतर एफसी गोवा संघ जबरदस्त दबावाखाली

किशोर पेटकर

Indian Super League Football

इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेच्या दहाव्या मोसमात सलग बारा सामने अपराजित राहिल्यानंतर एफसी गोवा संघ आता जबरदस्त दबावाखाली आहे. सलग तीन पराभव पत्करल्यानंतर बुधवारी (ता.28) त्यांच्यासमोर बलाढ्य मुंबई सिटीचा अडथळा पार करण्याचे आव्हान आहे.

सामना मुंबई येथे खेळला जाईल. मुंबई सिटीचे सध्या १५ लढतीतून ३१ गुण असून ते दुसऱ्या क्रमांकावर आहेत. अव्वल स्थानावरील ओडिशापेक्षा (३२ गुण) त्यांचा फक्त एक गुण कमी आहे. मुंबई सिटीने मागील सलग तीन सामने जिंकले आहेत.

एफसी गोवाचे १५ लढतीनंतर २८ गुण असून ते पाचव्या क्रमांकावर घसरले आहेत. मागील लढतीत कोची येथे पूर्वार्धात दोन गोलची आघाडी घेऊनही एफसी गोवास केरळा ब्लास्टर्सकडून ४-२ फरकाने पराभूत व्हावे लागले.

एफसी गोवाच स्वतःचे प्रतिस्पर्धा - मार्केझ

सलग पराभवानंतर आपल्या संघाने आता सावरणे आवश्यक असून प्रत्युत्तरास सज्ज होणे गरजेचे आहे, सामना अत्यंत कठीण आहे, असे मत एफसी गोवाचे प्रशिक्षक मानोलो मार्केझ यांनी मुंबई सिटीविरुद्ध पूर्वसंध्येला मंगळवारी व्यक्त केले.

एफसी गोवा संघ सध्या स्वतःचाच प्रतिस्पर्धी बनला आहे. विजय मिळविल्यास संघाला गुणतक्त्यात प्रगतीची संधी असेल, याकडे एफसी गोवाच्या प्रशिक्षकाने लक्ष वेधले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

Goa News Live: ओपा जल शुद्धीकरण प्रकल्पाजवळ ट्रक दरीत कोसळला

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT