Indian Super League 2024-25 Dainik Gomantak
गोवा

Indian Super League: FC GOAचा 'ब्रायसन' ठरला सर्वोत्तम उदयोन्मुख फुटबॉलपटू, आयएसएल 2024-25च्या मोसमात शानदार कामगिरी

FC Goa Bryson: लोटली येथील ब्रायसनने आतापर्यंत सीनियर पातळीवर एफसी गोवाचे ५६ सामन्यांत प्रतिनिधित्व केले असून ११ गोल व चार असिस्टची नोंद केली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी : एफसी गोवाचा प्रतिभावान मध्यरक्षक ब्रायसन फर्नांडिस इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत २०२४-२५ मोसमातील सर्वोत्तम उदयोन्मुख फुटबॉलपटू ठरला.

मध्यफळीत खेळणाऱ्या २३ वर्षीय ब्रायसनने यावेळच्या आयएसएल मोसमातील २४ सामन्यांत सात गोल नोंदविले, तसेच दोन असिस्टचीही नोंद केली. संघाच्या मोहिमेत त्याने २७ वेळा संधी निर्माण केल्या. एफसी गोवाने स्पर्धेच्या साखळी फेरीत ४८ गुणांसह द्वितीय क्रमांक पटकावला. त्यात ब्रायसनची कामगिरी लक्षवेधी ठरली. उपांत्य फेरीत एफसी गोवास बंगळूर एफसीविरुद्ध २-३ गोलसरासरीने निसटती माघार घ्यावी लागली.

ब्रायसन २०१६ पासून एफसी गोवा संघाशी जोडलेला आहे. त्यांच्या १६ वर्षांखालील संघात दाखल झाल्यानंतर शानदार सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर त्याने २०२१ मध्ये एफसी गोवाच्या मुख्य संघातर्फे पदार्पण केले.

लोटली येथील ब्रायसनने आतापर्यंत सीनियर पातळीवर एफसी गोवाचे ५६ सामन्यांत प्रतिनिधित्व केले असून ११ गोल व चार असिस्टची नोंद केली आहे. एफसी गोवाच्या युवा विकास कार्यक्रमाचा ब्रायसनच्या प्रगतीत मोलाचा वाटा आहे. त्याने एफसी गोवाच्या डेव्हलेपमेंट संघातर्फे एआयएफएफ एलिट लीग, जीएफए प्रोफेशनल लीग, गोवा पोलिस कप, आरएफडीएल या स्पर्धांत उल्लेखनीय खेळ केलेला आहे.

प्रशिक्षक मार्केझ यांच्याकडून कौतुक

आयएसएल स्पर्धेत सर्वोत्तम उदयोन्मुख फुटबॉलपटू ठरलेल्या ब्रायसन फर्नांडिसचे एफसी गोवाचे मुख्य प्रशिक्षक मानोलो मार्केझ यांनी कौतुक केले. ब्रायसनविषयी ते म्हणाले की, ‘‘तो एक अतिशय प्रतिभावान खेळाडू असून आपलं काम आवडीने करणारा आणि त्याचा आनंद लुटणारा पारंपरिक गोमंतकीय आहे. दिवसेंदिवस तो प्रगतीवर भर देत असून नेहमीच नम्र राहतो. महत्त्वाचे म्हणजे तो छान सहकारी आहे. माझ्या मार्गदर्शनाखाली खेळलेला तो सर्वोत्तम भारतीय फुटबॉलपटूंपैकी एक आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ro-Ro Car Train Service: गणेशोत्सवापूर्वी कोकण रेल्वेची पहिली रो-रो कार ट्रेन गोव्यात दाखल, जाणून घ्या भाडे?

Porvorim: ओ कोकेरो ते मॉल दी गोवा रस्ता 5 दिवसांच्या गणेश चतुर्थीनंतरच होणार बंद; CM सावंतांनी केले स्पष्ट

Asia Cup 2025: टी-20 आशिया कपमध्ये भारताच्या नावावर 'महा कीर्तिमान'! 'या' संघाविरुद्ध उभारला धावांचा डोंगर; यंदा कोण मोडणार टीम इंडियाचा रेकॉर्ड?

Goa Waterfall Ban: पावसाळ्यातील अपघातांवर अंकुश! उत्तर गोव्यातील धबधबे अन् नद्यांमध्ये प्रवेशास बंदी; जिल्हाधिकाऱ्यांकडून आदेश जारी

Viral Video: बघता-बघता फिटनेस सेंटर बनले 'आखाडा'; जिममध्ये तरुणांची तुंबळ हाणामारी, रॉडने हल्ला केल्याचा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT