Noah Sadoi Dainik Gomantak
गोवा

Indian Super League: नोआ सदोईचा 'झंझावात'; एफसी गोवाने हैदराबाद एफसीचा उडवला धुव्वा

FC Goa beat Hyderabad FC: फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरु स्टेडियमवर सदोई याने एफसी गोवातर्फे यावेळच्या आयएसएल मोसमातील पहिली हॅटट्रिक नोंदवली.

किशोर पेटकर

Indian Super League: इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल सामन्यात दुबळ्या हैदराबाद एफसीविरुद्ध पूर्वार्धात चेंडूवर 65 टक्के वर्चस्व राखूनही एफसी गोवाला गोल नोंदवता आला नाही, मात्र उत्तरार्धाच्या पहिल्याच मिनिटास बदली खेळाडू म्हणून मैदानात आलेल्या नोआ सदोईने कमाल केली. त्याच्या हॅटट्रिकच्या बळावर मानोलो मार्केझ यांच्या मार्गदर्शनाखालील संघाने 4-0 असा दणदणीत विजय प्राप्त केला.

दरम्यान, फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरु स्टेडियमवर सदोई याने एफसी गोवातर्फे यावेळच्या आयएसएल मोसमातील पहिली हॅटट्रिक नोंदवली. त्याने अनुक्रमे 47व्या, 54व्या व 59व्या मिनिटास गोल केला. त्याने वैयक्तिक पहिला व तिसरा गोल महंमद यासीरच्या असिस्टवर, तर दुसरा गोल कर्णधार ब्रँडन फर्नांडिसच्या असिस्टवर नोंदवला. 84व्या मिनिटास कार्लोस मार्टिनेझ याने एफसी गोवाच्या विजयावर शिक्कामोर्तब करताना ब्रँडन फर्नांडिसच्या असिस्टवर सरळ रेषेतील फटक्यावर प्रतिस्पर्धी गोलरक्षक लक्ष्मीकांत कट्टीमणी याला पूर्णपणे चकवा दिला.

चौथ्या स्थानी कायम

एफसी गोवाचा हा स्पर्धेतील 20 लढतीतील 11 वा विजय ठरला. ओडिशा एफसी (+16), मोहन बागान (+15) व एफसी गोवा (+14) या तिन्ही संघांचे समान 39 गुण झाले आहेत. गोलसरासरीत त्यांना अनुक्रमे दुसरा, तिसरा व चौथा क्रमांक मिळाला आहे. ओडिशा व एफसी गोवा प्रत्येकी 20, तर मोहन बागान 19 सामने खेळला आहे. मुंबई सिटी 20 सामन्यांतून 44 गुणांसह अव्वल स्थानी आहे. एफसी गोवाचा पुढील सामना 9 एप्रिल रोजी जमशेदपूर एफसीविरुद्ध अवे मैदानावर होईल. हैदराबाद एफसीवर तब्बल 15व्या पराभवाची नामुष्की आली. त्यांचे 21 लढतीनंतर फक्त आठ गुण आणि शेवटचा 12वा क्रमांक कायम राहिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'पोगो'वरुन गदारोळ, युरी आलेमावांनी गॅझेट फाडून हवेत भिरकावले, खुर्च्या उचलण्याचा प्रयत्न; MLA वीरेश बोरकरांना काढले सभागृहातून बाहेर

eSakal No 1: ई-सकाळचा करिष्मा कायम! 21.2 दशलक्ष वाचकांसह पुन्हा 'नंबर वन'

Video: चोरट्याची फजिती! स्कूटी घसरली, हेल्मेट पडलं अन् स्वतःही पडला; सोशल मीडियावरील 'हा' व्हिडिओ एकदा बघाच

IND vs ENG 4th Test: ओल्ड ट्रॅफर्डवर जो रुटचा दबदबा, द्रविड-कॅलिसला मागे टाकून रचला इतिहास; नावावर केला 'हा' मोठा रेकॉर्ड

Goa Assembly: पोगो ठरावावरुन विधानसभेत राडा, सभापती संतापले, वीरेश बोरकरांना सभागृहातून काढले बाहेर; वाचा दिवसभरातील घडामोडी

SCROLL FOR NEXT