Pythons in Fatorda PWD land Dainik Gomantak
गोवा

फातोर्डा येथील 'साबांखा'च्या जागेत अजगरांचा धुमाकूळ, लोकांमध्ये भीतीचे वातावरण

Pythons in Fatorda PWD land: आगाळी-फातोर्डा येथील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या जागेत चार ते पाच मोठे अजगर सापडले आहेत.

गोमंतक ऑनलाईन टीम

सासष्टी: आगाळी-फातोर्डा येथील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या जागेत चार ते पाच मोठे अजगर सापडले आहेत. त्यामुळे सभोवताली राहत असलेल्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

यासंदर्भात केतन नार्वेकर यांनी सांगितले की, पूर्वी या जागेत खात्यामार्फत स्वच्छता केली जात असे. शिवाय तिथे आग लावली जात असे; पण गत सात वर्षांपासून ही जागा म्हणजे स्क्रॅप यार्ड झाले आहे. इथे मोठ-मोठे पाईप ठेवले आहेत, त्यामुळे अजगर, साप, दीवड यासारख्या सरपटणाऱ्या प्राण्यांचा सुळसुळाट झालेला दिसतो. आपल्या घरामागेही साप आहेत. या जागेचा वापर गेल्या ३० वर्षांपासून सार्वजनिक बांधकाम खात्यामार्फत केला जात आहे.

दरम्यान, स्थानिकांनी उपजिल्हाधिकाऱ्यांना यासंदर्भात माहिती दिली असून त्यांनी ही जागा स्वच्छ करण्यास साबांखाला सांगितले आहे, अशी माहिती मिळाली आहे.

प्राणी रक्षक ज्युलियो क्वाद्रोस यांनी सांगितले की, आम्ही एक अजगर पकडला आहे. पण इथे चार ते पाच अजगर असायला हवेत. या सर्वांना पकडले तरी आणखी काही महिन्यांनी इथे आणखी अजगर सापडू शकतात. त्यामुळे आम्ही अशा प्राण्यांबाबत माहिती जाणून घेऊन, सजग राहायला शिकणे आवश्यक आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांची 'चांदी'! एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात मिळणार गूड न्यूज; 8व्या वेतन आयोगाबाबत आली अपडेट

Horoscope April 2026: मंगळाची कमकुवत स्थिती अन् कुंभ राशीची कसोटी; नोकरीत वाढणार कामाचा ताण, व्यवसायातही सावधगिरीचा इशारा

Pakistan Economic Crisis: आर्थिक त्सुनामीनं पाकड्यांच्या उडाल्या चिंधड्या! युएईनं 2 अब्ज डॉलर्सचं कर्ज मागितलं परत; पाकिस्तानच्या खजिन्याला पडलं खिंडार

"रागाच्या भरात दिली होती तक्रार", सख्ख्या बहिणीची साक्ष फिरली, विनयभंगाच्या आरोपातून संशयित भावाची निर्दोष मुक्तता

Goa Drug Case: गोव्यातील 'नाईट पार्टी' ठरली अखेरची! इंदूरच्या 21 वर्षीय तरुणाचा हणजूणमध्ये संशयास्पद मृत्यू; ड्रग्जचा ओव्हरडोस? तपास सुरु

SCROLL FOR NEXT