Man arrested for theft from bike Dainik Gomantak
गोवा

Fatorda: पूर्व वैमनस्यातून एकाला भर रस्त्यात मारहाण; फरार तिघे पोलिसांच्या ताब्यात

अन्य तिघांची न्यायालयीन कोठडीत रवानगी

दैनिक गोमन्तक

मडगाव: पूर्व वैमनस्यातून गुंड विजय कुलाल याला नग्न करून भर रस्त्यात जबर मारहाण केल्याच्या आरोपाखाली फातोर्डा पोलिसांना हवे असलेल्या जोझेफ सिक्वेरा, वाल्टर फर्नांडिस व सिमोन फर्नांडीस या तीन संशयितांनी अटकपूर्व जामिनासाठी केला होता. यावर आज मडगाव सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली हा अर्ज न्यायलयाने फेटाळला आहे. यामुळे तिन्ही संशयितांना पोलीसांनी त्वरित ताब्यात घेतले.

(Fatorda police have arrested 6 suspects in the Vijay Kulal case)

दरम्यान या प्रकरणात फातोर्डा पोलिसांनी या पूर्वी अटक केलेल्या अफझल हुसेन शेख, रिहान अहमद, कृष्णा लोहार या तिघांच्या पोलीस कोठडीचा रिमांड आज संपला. मागच्या रविवारी या संशयितांनी कोलवा सर्कलजवळ रात्रीच्या वेळी सहा जणांच्या गटाने कुख्यात गुंड विजय कुलाल याला भररस्त्यात नग्न करून लाथाबुक्यांनी तसेच दांडुके, दगड घेऊन जबर मारहाण केली होती. या प्रकरणी विजय कुलाला याने पोलीस तक्रार केली होती.

या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी तिघाजणांना अटक केली असून आणखी तिघांचा शोध घेण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला होता, मात्र ते मिळू शकले नव्हते. ते फरार झाल्यानंतर आपल्याला अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी त्यांनी अर्ज केला होता. तो न्यायालयाने आज नाकारल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Parra Road: 'हे झाड कधीही कोसळेल!' 2.5 वर्षांपासून दुर्लक्ष; साळगाव सरपंचांचा वन विभागाला 'अल्टिमेटम'

Gold Silver Price: धनतेरसपूर्वी सोन्याचा नवा रेकॉर्ड! भाव 1 लाख 27 हजारांच्या पार; चांदीनंही दाखवली पुन्हा चमक

KBC Viral Video: "मला नियम सांगू नका", करोडपतीच्या सेटवर बिग-बींना उलटउत्तर; 10 वर्षांच्या स्पर्धकावर नेटकऱ्यांची टीका

Goa News: 'हो' प्रस्न सोडयात! कामगार आक्रमक; शिरगावच्या बांदेकर खाणीवरील कामकाज रोखले Video

Kuldeep Yadav: टीम इंडियाचा नवा विकेट किंग! कुलदीप बनला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताचा 'नंबर 1' गोलंदाज VIDEO

SCROLL FOR NEXT