Fatorda Kidnapping Case: Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: बेपत्ता अल्पवयीन मुलीच्या शोधात गोवा पोलिसांनी गाठले रायचूर, सुखरुप सुटका करत संशयिताला ठोकल्या बेड्या; पुढील तपास सुरु

Fatorda Kidnapping Case: फातोर्डा येथून अपहरण झालेल्या एका 17 वर्षीय तरुणीचा शोध लावण्यात गोवा पोलिसांना मोठे यश मिळाले.

Manish Jadhav

फातोर्डा: फातोर्डा येथून अपहरण झालेल्या एका 17 वर्षीय तरुणीचा शोध लावण्यात गोवा पोलिसांना मोठे यश मिळाले. पोलिसांनी या तरुणीला आणि अपहरण करणाऱ्या संशयित आरोपीला कर्नाटकातील रायचूर येथून ताब्यात घेतले.

रायचूरमध्ये सापडली

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फातोर्डामधून 17 वर्षीय अल्पवयीन तरुणीचे अपहरण झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरु केला होता. तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांना आरोपी आणि तरुणीचा ठावठिकाणा कर्नाटकमधील रायचूर येथे असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर तातडीने गोवा पोलिसांचे एक पथक रायचूरला रवाना केले. रायचूर येथून पोलिसांनी तरुणीला सुखरुप ताब्यात घेतले आणि आरोपी नरसप्पा नरसू यालाही अटक केली.

गोव्यात परत

फातोर्डा पोलीस पथक तरुणी आणि आरोपी नरसप्पा नरसू यांना घेऊन काल (10 डिसेंबर) रात्री गोव्यात (Goa) परतले. तरुणी अल्पवयीन असल्याने तिची रवानगी सुरक्षित ठिकाणी असलेल्या ‘अपना घर’ मध्ये करण्यात आली. नियमानुसार, तिची वैद्यकीय तपासणी आणि समुपदेशन केले जाईल. पोलिसांनी आरोपी नरसप्पा नरसू याच्यावर कायदेशीर कारवाई सुरु केली.

गुन्हा दाखल

दुसरीकडे, फातोर्डा पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 137 (अपहरण आणि पळवून नेणे) आणि गोवा बाल अधिनियम अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे. अपहरण नेमके कोणत्या उद्देशाने करण्यात आले, तसेच आरोपी आणि तरुणी एकमेकांच्या ओळखीचे होते का? यासारख्या सर्व बाबींचा तपास पोलीस करत आहेत. अल्पवयीन मुलीच्या अपहरणासारख्या (Kidnapping) गंभीर गुन्ह्यांमध्ये जलद तपास केल्याबद्दल गोवा पोलिसांचे कौतुक होत आहे. पोलिसांच्या जलद कारवाईमुळे 17 वर्षीय तरुणी सुखरुप तिच्या कुटुंबीयांकडे परत येऊ शकणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Accident Death: महाखाजन-धारगळ येथे भीषण अपघात, ट्रकची दुचाकीला मागून धडक; एक दाम्‍पत्‍य ठार

Horoscope: मंगलमय मंगळवार! 'या' भाग्यवान राशींचे नशीब फळफळणार, घरात येणार सुख-समृद्धी, आर्थिक प्रगती निश्चित

'स्मार्ट' शब्दाचा केवळ दिखावा? गोव्यातील रस्ते आणि वीज मीटरवरून प्रशासनाचा बोजवारा!

ज्ञान की अज्ञान? पाश्चात्य संस्कृतीत 'विद्वान' असणारे घुबड भारतीय संदर्भात 'उल्लू' का?

US Iran Peace Deal: "आम्ही अमेरिकेचे गुलाम नाही!" नेतन्याहूंच्या मंत्र्याचा ट्रम्प यांच्या शांतता करारावर थेट हल्ला; जागतिक राजकारणात खळबळ

SCROLL FOR NEXT