Fatorda Crime News Canva
गोवा

Goa Crime: लैंगिक अत्याचार प्रकरण! कासावलीतील गेस्‍ट हाऊस पोलिसांकडून सील; जलद न्यायालयात खटला चालवण्याची मागणी

Fatorda Crime: गेस्‍ट हाऊसच्‍याच चालकांनी या युवकांची कुठलीही लेखी नाेंद करून ठेवली नव्‍हती, असे पोलिस तपासात उघड झाले आहे.

Sameer Panditrao

Fatorda sexual assault case

मडगाव: एका मतिमंद युवतीला कासावली येथील ज्‍या गेस्‍ट हाऊसमध्‍ये नेऊन तिच्‍यावर सामूहिक बलात्‍कार करण्‍यात आला, त्‍या गेस्‍ट हाऊसमध्‍ये अटक केलेल्‍या पाच संशयितांपैकी एका संशयिताने यापूर्वीही काही मुलींना आणले होते आणि त्‍यांच्‍याशी शरीरसंबंध ठेवले होते, अशी माहिती पुढे आली आहे.

या प्रकरणात अटक केलेले सर्व संशयित १८ ते २२ या वयोगटातील असून या सर्वांचा अशाप्रकारच्‍या घटनांत यापूर्वीही सहभाग होता का, याचा सध्‍या पोलिस तपास घेत आहेत. दरम्‍यान, कासावली येथील ‘त्‍या’ गेस्‍ट हाऊसला पाेलिसांनी सील ठोकले असून संशयितांनी आपले हे कुकर्म करण्‍यासाठी जे दोन रुम भाड्याने घेतले होते, तेही सील केले आहेत.

दरम्‍यान, ज्‍या दुचाकीवरून त्‍या दुर्दैवी युवतीला दाबोळी जंक्‍शनवर आणण्‍यात आले आणि ज्‍या बोलेरो गाडीने तिला तिथून कासावलीला नेण्‍यात आले. या दोन्‍ही वाहनांचे परवाने रद्द करण्‍यासाठी फातोर्डा पोलिसांनी आरटीओ कार्यालयाशी संपर्क साधल्‍याचे सांगण्‍यात येते. ज्‍या गेस्‍ट हाऊसमध्‍ये ‘त्‍या’ युवतीवर हा बलात्‍कार करण्‍यात आला. त्‍या गेस्‍ट हाऊसच्‍याच चालकांनी या युवकांची कुठलीही लेखी नाेंद करून ठेवली नव्‍हती, असे पोलिस तपासात उघड झाले आहे. फातोर्डा पोलिस या प्रकरणात अधिक तपास करीत आहेत.

पाच माेबाईल फोन जप्त

ही घटना २२ जानेवारी रोजी रात्री ८ ते २३ जानेवारी पहाटे ३.३० वा.च्‍या दरम्‍यान घडली होती. ती युवती केपेहून मडगावला आली होती. रात्री ८ वाजण्‍याच्‍या सुमारास ती मडगाव कदंब बसस्‍थानकाच्‍या आवारात फिरत असताना आदिल अलगूर या संशयिताची तिच्‍यावर नजर पडली. तिच्‍याशी गोड बोलून त्‍याने तिचा विश्‍वास संपादन केला. त्‍यानंतर बसमधून त्‍याने तिला वास्‍कोला नेले.

वास्‍कोहून मोटरसायकलवरून दाबोळी जंक्‍शनवर घेऊन आला. तिथे त्‍याने आपल्‍या अन्‍य चार साथीदारांशी फोनवरून संपर्क साधला. नंतर तिला कासावलीच्‍या ‘त्‍या’ गेस्‍ट हाऊसवर घेऊन गेले. त्‍यानंतर सर्वांनी आळीपाळीने तिच्‍यावर अतिप्रसंग केला. नंतर पहाटे ४ वाजण्‍याच्‍या सुमारास ‘त्‍या’ युवतीला नुवे जंक्‍शनवर सोडून हे सर्व संशयित पळून गेेले. या प्रकरणात पाेलिसांनी पाच माेबाईल फोन जप्‍त केले आहेत.

पोलिसांनी आदिल लालसाब अलगूर (१८), महम्‍मद मुल्‍ला (२२), शहजाद शेख (१८), वीरेश अगुवान्‍डा (१८) आणि महम्‍मद शेख (१८) यांना अटक केली आहे. ते सध्‍या पोलिस कोठडीत आहेत. यातील चौघे विद्यार्थी असून महम्‍मद मुल्‍ला हा गाडी चालविणारा आहे.

कासावली गँग रेप प्रकरण जलद न्यायालयात चालवावे

कासावली येथील गँग रेप प्रकरणाचा खटला जलद न्यायालयात चालवावा, अशी मागणी महिला काँग्रेसने केली. याशिवाय त्या गेस्ट हाऊस मालकावरही कारवाईची मागणी करण्यात आली.

राज्यात बलात्कारासह महिलांवरील अत्याचारांत वाढ झालेली आहे. राज्यातील महिलांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक त्या उपाययोजना गृह खात्याकडून करण्यात याव्यात, अशी मागणी यावेळी करण्यात आली. महिला काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी दक्षिण गोवा जिल्हा काँग्रेस कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी सचिव मनीषा उसगावकर, प्रतिभा बोरकर व अ‍ॅड. स्नेहा ओंसकर उपस्थित होत्या.

उसगावकर यांनी सांगितले की, एका मानसिक संतुलन बिघडलेल्या युवतीला गाडीतून घेऊन जातात; पण पोलिसांची कारवाई तोपर्यंत का होत नाही. दोन महिला पोलिस स्थानके, पिंक फोर्स व पोलिसांची गस्त या गोष्टी नावालाच आहेत का, असा प्रश्न निर्माण होतो. महिला सुरक्षिततेवर लक्ष देण्याची गरज आहे. गेस्ट हाऊसवर पाच युवकांसह एका युवतीला जाण्यास परवानगीच कशी दिली. पोलिसांनी विरोधकांची सतावणूक करण्याऐवजी महिलांच्या सुरक्षिततेवर लक्ष देत गोव्यातील गुन्हेगारी कमी करावी. त्या गेस्ट हाऊसकडून संशयितांना परवानगी नाकारून पोलिसांना माहिती देण्यात आली असती तर हा प्रकार घडलाच नसता, त्यामुळे गेस्ट हाऊसवर व मालकावर कडक कारवाई करावी.

गँग रेपमधील गुन्हेगारांना पोलिसांनी अटक केलेली आहे. आता हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात यावे व त्या युवतीला न्याय मिळवून द्यावा. हे भयंकर कृत्य गेस्ट हाऊसच्या सहकार्याशिवाय झालेले नाही, त्यावरही कायदेशीर कारवाई व्हावी. राज्यातील इतरही गेस्ट हाऊसवर अचानकपणे भेटी देत तपासणी करावी, अशी मागणी प्रतिभा बोरकर यांनी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

World Cup 2025: टीम इंडियासाठी 'करो या मरो'चा सामना, उपांत्य फेरी गाठण्यासाठी 'विजय' आवश्यक; इंग्लंडविरुद्ध 'अशी' असेल Playing 11

Goa Diwali Bazar: पणजी, दिवचल भरला दिवाळी बाजार...

Pakistan-Afghanistan War: "पाकिस्तान क्रिकेट को बर्बाद करना चाहता है…" माजी अफगाण कर्णधाराची शत्रू देशावर टीका

राजधानीत नरकासुराचा 'हाहाकार', दिवाळीची तयारी जोरदार ; Watch Video

जब तक सूरज - चांद रहेगा तब तक पर्रीकर- रवि तुम्हारा नाम रहेगा! मागोवा

SCROLL FOR NEXT