
Fatorda sexual assault case
मडगाव: मतिमंद मुलीवरील गँग रेप प्रकरणात संशयितांनी गुन्ह्यासाठी वापरलेल्या कासावली येथील गेस्ट हाऊसचा पर्यटन परवाना रद्द करण्याची शिफारस फातोर्डा पोलिसांनी केली आहे. शिवाय संशयितांनी वापरलेल्या भाड्याच्या कारचा परवानाही रद्द करण्याची शिफारस पोलिसांनी वाहतूक खात्याकडे केली आहे.
गॅंग रेप प्रकरणात ज्या गेस्ट हाऊसचा वापर केला, त्याला टाळे ठोकावे तसेच त्याच्या मालकाची कसून चौकशी करावी, अशी मागणी ‘बायलांचो एकवोट’च्या अध्यक्ष आवदा व्हिएगस यांनी केली आहे. मतिमंद मुलीवर बलात्कार केल्यानंतर संशयितांनी तिला नुवे जंक्शनवर आणून सोडले होते. तेथे ती रडत उभी असताना त्या मार्गावरून जाणाऱ्या एका गृहस्थाने तिला पाहिले आणि पोलिसांना याची माहिती दिली.
पोलिसांनी त्वरित त्याची दखल घेतली व चौकशीची सूत्रे हलविली. नंतर त्या पाचही नराधमाच्या मुसक्या आवळल्या. कासावली येथे एका गेस्ट हाऊसमध्ये नेऊन संशयितांनी तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला होता. तीन दिवसांपूर्वी ही घटना घडली होती. आदिल अलगूर, मोहम्मद मुल्ला, शहजाद शेख, विरेश अंगुडा व मोहम्मद शेख अशी संशयितांची नावे असून ते सर्वजण वास्को येथील आहेत. सध्या त्यांना सात दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली असून कसून चौकशी चालू असल्याची माहिती दक्षिण गोवा पोलिस निरीक्षक सुनीता सावंत यांनी दिली.
गॅंग रेप प्रकरणात ज्या गेस्ट हाऊसचा वापर करण्यात आला, ते सील करावे व त्याच्या मालकाची कसून चौकशी करावी, अशी मागणी ‘बायलांचो एकवोट’च्या अध्यक्ष आवदा व्हिएग्स यांनी केली आहे. दक्षिण गोवा पोलिस अधीक्षकांकडे त्यांनी ही मागणी केली. एका मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणी पोलिसानी केलेल्या तपास कामांची त्यांनी अभिनंदन केले आहे. एकटी महिला रस्तावर चालत असताना, वा बसस्थानक , रेल्वे स्थानकांवर असताना त्यांना सुरक्षा दिली पाहिजे. पिंक फोर्स वा स्थानिक पोलिसांकडे ती जबाबदारी द्यावी, असे गुन्हे घडू नये, यासाठी दक्षता घेण्याची गरजही व्हिएगस यांनी व्यक्त केली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.