Court Dainik Gomantak
गोवा

Fatorda: फसवणूक करणाऱ्या ‘त्या’ बिल्‍डरची तुरुंगात रवानगी! भरपाई नाही, सुनावणीस गैरहजर; ग्राहक आयोगाने दिला लक्षवेधी आदेश

Consumer commission in South Goa: बिल्‍डरकडून दाम्‍पत्‍याला फ्‍लॅट देण्‍यात येणार होते. मात्र, प्रकल्‍प पूर्ण झाल्‍यानंतरही बिल्‍डरने फ्‍लॅट न दिल्‍याने त्‍यांनी आयाेगासमोर दावा दाखल केला होता.

Sameer Panditrao

Fatorda Builder Fraud

मडगाव: ग्राहकाला फ्‍लॅट न देताच दाव्‍याच्‍या सुनावणीवेळीही गैरहजर राहणाऱ्या फातोर्डा येथील शेख अब्दुल अझीम या बिल्‍डरविराेधात दक्षिण गोवा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने जो फरारनामा जारी केला, तो मागे घेण्यासाठी या बिल्‍डरने दाखल केलेला अर्ज दक्षिण गोवा आयोगाच्‍या अध्‍यक्षाने फेटाळला. या प्रकरणाची सुनावणी १९ मार्चपर्यंत तहकूब केली. मात्र, ताेपर्यंत बिल्‍डरला न्‍यायालयीन काेठडीत ठेवावे, असा आदेश देत या बिल्‍डरची रवानगी थेट तुरुंगात केली.

अशाप्रकारे कुठल्‍याही प्रतिवादीला ग्राहक आयोगाकडून थेट तुरुंगात पाठविण्‍याची राज्‍यातील ही पहिलीच घटना असल्‍याने या आदेशाकडे लक्षवेधी आदेश म्‍हणून पाहिले जात आहे. दक्षिण गोवा ग्राहक तक्रार निवारण मंचचे अध्‍यक्ष संजय चोडणकर आणि सदस्‍य जेसन रॉड्रिग्स यांच्‍यासमोर हा दावा सुनावणीस आला होता.

या बिल्‍डरविरोधात आंतोनियो कार्मू फेर्रांव आणि गोरेटी फेर्रांव यांनी हा दावा केला होता. तक्रारदारांच्‍या वतीने ॲड. प्रीतम मोराईश आणि ॲड. अपूर्वा नाईक यांनी बाजू मांडली.

या प्रकरणाची पार्श्‍वभूमी अशी की, फेर्रांव दाम्‍पत्‍याची जमीन या बिल्‍डरने विकसित करण्‍यासाठी घेतली होती. त्या बदल्‍यात बिल्‍डरकडून या दाम्‍पत्‍याला फ्‍लॅट देण्‍यात येणार होते. मात्र, प्रकल्‍प पूर्ण झाल्‍यानंतरही बिल्‍डरने त्‍यांना फ्‍लॅट न दिल्‍याने त्‍यांनी ग्राहक आयाेगासमोर दावा दाखल केला होता.

भरपाईचा आदेशही धाब्यावर

२०१८ साली हा दावा निकाली काढताना बिल्‍डरने दाम्‍पत्‍याला फ्‍लॅट द्यावेत आणि नुकसान भरपाई म्‍हणून जून २०१२ पासून प्रत्‍येक महिन्‍याला सहा हजार रुपये, तर १ जानेवारी २०१३ पासून प्रत्‍येक दिवसाला एक हजार रुपये याप्रमाणे पैसे द्यावेत, असा आदेश मंचने दिला होता. मात्र बिल्‍डरने या आदेशाचीही पूर्ती न केल्‍याने या दाम्‍पत्‍याने त्‍याच्‍यावर कारवाईसाठी ग्राहक आयोगाकडे अर्ज दाखल केला होता.

‘फरारनामा रद्द’चा अर्ज फेटाळला

या अर्जाच्‍या सुनावणीवेळीही बिल्‍डर हजर राहात नसल्‍यामुळे त्‍याच्‍याविरुद्ध अजामीनपात्र अटक वॉरन्‍ट तर दोनदा फरारनामा जाहीर केला. हा फरारनामा रद्द करावा, यासाठी बिल्‍डरने ग्राहक आयोगाकडे अर्ज दाखल केला होता. मात्र, बिल्‍डर वेळोवेळी न्‍यायालयाची दिशाभूल करत असल्‍याचे लक्षात आल्‍यावर या बिल्‍डरचा अर्ज फेटाळला आणि सुनावणी पूर्ण होईपर्यंत न्‍यायालयीन कोठडीत ठेवावे, असा आदेश ग्राहक तक्रार निवारण आयोगाने दिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: धक्कादायक! अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करत केली मारहाण; सत्तरीतील 19 वर्षीय संशयित तरुणाला अटक

Goa Cyber Crime: पणजीतील ज्येष्ठ नागरिकाला 4.74 कोटींचा गंडा! बनावट गुंतवणूक घोटाळ्याच्या मुख्य आरोपीला कोल्हापुरातून अटक; गोवा पोलिसांची मोठी कारवाई

Goa Weather Update: गोव्यात विजांच्या कडकडाटासह बरसणार मुसळधार सरी, आयएमडीने जारी केला 'नाऊकास्ट' इशारा; नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

PM मोदींच्या दौऱ्यासाठी काणकोणमध्ये 3 हेलिपॅड सज्ज! 77 फूट उंच श्रीरामांच्या मूर्तीचे करणार अनावरण

26 नोव्हेंबरला दुर्मिळ 'लक्ष्मी नारायण योग'! 'या' 4 राशींच्या लोकांवर होणार धन वर्षा, करिअरमध्ये मोठ्या प्रगतीचा योग; उत्पन्नाचे स्रोत वाढणार

SCROLL FOR NEXT