Aleixo Sequeira Dainik Gomantak
गोवा

चेहऱ्यावर थकवा, शब्द अडखळले; दिल्लीत उपचार घेऊन परतलेल्या मंत्री सिक्वेरांनी शांतपणे LOP युरींना दिले उत्तर

Goa Assembly Monsoon Session 2025: जिंदाल, अदानीसारख्या कंपन्यांकडून सरकारची ४ हजार कोटींची फसवणूक झाल्याचा आरोप विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केला.

Pramod Yadav

पणजी: हरित कराच्या (ग्रीन सेस) प्रश्नावरुन शुक्रवारी (०१ ऑगस्ट) सभागृहात सत्ताधारी आणि विरोधकांत खडाजंगी झाली. हरित करात ३ ते ४ हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप करित विरोधकांनी सभापतींच्या हौदात धाव घेतली. यानंतर सभागृहाचे कामकाज १० मिनिटांसाठी स्थगित करावे लागले. दरम्यान, यापूर्वी युरी आलेमाव यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला पर्यावरण आणि कायदा मंत्री आलेक्स सिक्वेरांनी शांतपणे उत्तर दिले. 

मंत्री आलेक्स सिक्वेरा गेल्या काही दिवसांपासून आजारी आहेत, त्यांच्यावर दिल्लीत उपचार झाल्यानंतर नुकतेच ते गोव्यात परतले. काही दिवस आराम केल्यानंतर त्यांनी पावसाळी अधिवेशनाला हजेरी लावली. शुक्रवारी कोळसा वाहतूक आणि हरित करावरुन प्रश्नोत्तराच्या तासांत प्रश्न उपस्थित केल्यानंतर त्यांनी प्रश्नाला उत्तर दिले. यावेळी सिक्वेरा यांच्या चेहऱ्यावर थकवा स्पष्टपणे दिसत होता तसेच त्यांचे कही शब्द अडखळले पण, शांतपणे त्यांनी युरी आलेमाव यांच्या प्रश्नांना उत्तर दिले.

"जिंदालच्या जेएसडब्ल्यू कंपनीला राज्यात कोळसा हाताळण्याची मर्यादा ५ दशलक्ष टन होती. पण, या कंपनीने गेल्या काही वर्षांत मर्यादेपेक्षा दुप्पट कोळशाची हाताळणी केली. सार्वजनिक सुनावणीवेळी लोकांनी घेतलेले आक्षेप, किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाचे (CZMA) पत्र राज्य सरकारने पर्यावरण मंत्रालयास पाठवलेच नाही," असा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केला.

आलेक्स यांनी शांतपणे उत्तर देताना आलेमाव यांनी उललंघनाचा केलेल्या आरोपाची कबुली दिली. दरम्यान, याबाबत कारवाई करण्याचा सरकार विचार करत असल्याचे त्यांनी सांगितले. संबधित फाईल एजी (एडव्होकेट जनरलकडे) पाठल्याचे मंत्री सिक्वेरा यांनी सांगितले.

बगलमार्गामुळे वास्को शहरातून कोळसा वाहतूक होत नसल्याने प्रदुषण पातळी कमी झाली आहे,’ अशी माहिती पर्यावरण मंत्री आलेक्स सिक्वेरा यांनी यावेळी दिली.

यानंतर युरी चांगलेच आक्रमक झाले व त्यांनी सभापतींच्या हौदात गेले. विरोधकांनी हौदात जोरदार गोंधळ घातल्यानंतर सभापतींनी कामकाज १० मिनिटांसाठी स्थगित केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: जंगली जीवनाचा थरार! अजगराने दोन बेडूक गिळले, पण लोभ नडला; पुढे काय झालं ते तुम्हीच पाहा

Vidya Balan: 'तुझं नाक खूप मोठं आहे, सर्जरी कर...'; बॉलिवूड दिग्दर्शकाने विद्या बालनला का दिला होता सल्ला? स्वत:च केला मोठा खुलासा

Senior Citizens: देशातील 70 टक्के ज्येष्ठांचा खिसा रिकामा, उदरनिर्वाहासाठी अनेकजण निवृत्तीनंतरही कामावर

IND vs ENG: 'त्याला डिवचणं आमच्या प्लानचा भाग होता...'; जो रुटसोबतच्या वादावर प्रसिद्ध कृष्णाने सोडले मौन!

Goa News Live Update: 'बीएल‍ओ'च्या मानधनात दुपटीने वाढ!

SCROLL FOR NEXT