Arrest Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: किरकोळ कारणावरुन उसगावात मेकॅनिकला लोखंडी रॉडने मारहाण, बाप लेकाला अटक

Goa Crime News: उसगाव येथे गॅरेजमध्ये काम करत असलेल्या अशोक कुमारला सनगांवकर बाप लेकाने लोखंडी रॉडने मारहाण केली.

Pramod Yadav

Goa Crime News

फोंडा: किरकोळ कारणावरुन कार मेकॅनिकला लोखंडी रॉडने मारहाण केल्याची घटना तिस्क - उसगाव येथे उघडकीस आली आहे. मूळ ओडिशा येथील असणारा मेकॅनिक यात गंभीर जखमी झाला असून, त्याला उपचारासाठी गोमेकॉत दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी बाप लेकाला अटक करण्यात आली आहे.

अशोक कुमार बाबाजी सेठी (55, ओडिशा ) असे मारहाण झालेल्या मेकॅनिकचे नाव आहे. तर, कुणाल सनगांवकर (25 तिस्क-उसगाव) आणी किशन सनगांवकर (53, तिस्क-उसगाव ) असे अटक करण्यात आलेल्या बाप लेकाचे नाव आहे. याप्रकरणी फोंडा पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उसगाव येथे गॅरेजमध्ये काम करत असलेल्या अशोक कुमारला सनगांवकर बाप लेकाने लोखंडी रॉडने मारहाण केली. मारहाणीचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. दरम्यान, याबाबत फोंडा पोलिसांना तक्रार प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी सनगांवकर बाप लेकाला अटक केलीय. याप्रकरणी फोंडा पोलिस अधिक तपास करतायेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT