Arrest Dainik Gomantak
गोवा

Mapusa Accident: मुलाच्या बेजबाबदार कृत्याची बापाला शिक्षा! दुचाकीच्या धडकेत 12 वर्षीय मुलीचा मृत्यू; दोघांना तीन दिवसांची कोठडी

Minor Girl Dies In Two-Wheeler Accident: आपल्या मुलाच्या बेजबाबदार कृत्याची सजा पित्याला भोगावी लागली आहे. पेडे-म्हापसा येथे राष्ट्रीय महामार्गावर दुचाकीने दिलेल्या धडकेत १२ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला होता.

गोमन्तक डिजिटल टीम

म्हापसा: आपल्या मुलाच्या बेजबाबदार कृत्याची सजा पित्याला भोगावी लागली आहे. पेडे-म्हापसा येथे राष्ट्रीय महामार्गावर दुचाकीने दिलेल्या धडकेत १२ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी म्हापसा (Mapusa) पोलिसांनी दुचाकीमालक आणि दुचाकीवर मागे बसलेल्या १८ वर्षीय मुलाला अटक केली. शब्बीर कासीम शेख (वय ४८ वर्षे) आणि रिहान शेख अशी संशयितांची नावे आहेत.

पोलिसांच्या माहितीनुसार, हा अपघात २७ रोजी रात्री ७ च्या सुमारास घडला. या अपघातात आकांक्षा बोरो ही सातवीत शिकणारी अल्पवयीन मुलगी मरण पावली. पीडित मुलीचे कुटुंबीय मूळचे आसामचे आहेत.

रिहान (वय १८ वर्षे) आणि त्याचा अल्पवयीन मित्र (१६ वर्षीय) हे दोघेही दुचाकीवरून जात होते. दुचाकी अल्पवयीन मुलगा चालवत होता. त्याचवेळी रस्ता ओलांडून जाणाऱ्या आकांक्षाला दुचाकीची जोरात धडक बसली. या अपघातात ती जबर जखमी झाली.

तसेच अल्पवयीन दुचाकीस्वारालाही दुखापत झाली होती. अशा अवस्थेत रिहान आणि त्याच्या मित्राने आकांक्षाला मदत किंवा पोलिसांना माहिती न देताच घटनास्थळावरून पलायन केले. जखमी आकांक्षाला जिल्हा इस्पितळात दाखल केले असता, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

सायकलवरून पडल्याची मारली थाप

अपघातानंतर (Accident) संशयितांनी घटनास्थळावरून पलायन केले. त्यांनी आधी गाडी घरी नेऊन पार्क केली. अपघातात अल्पवयीन दुचाकीचालक जखमी झाला होता, तर रिहान किरकोळ जखमी झाला होता. दोघेही म्हापशातील एका खासगी इस्पितळात उपचारासाठी गेले. सायकलवरून पडल्याने जखमी झालो, अशी थाप तेथे त्यांनी मारली. परंतु, अपघातानंतर पोलिसांनी त्या इस्पितळात जाऊन चौकशी केली असता, या दोघांचेही बिंग फुटले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Omkar Elephant: सावधान! ‘ओंकार हत्ती’ गोव्याच्या सीमेवर; वन खाते पुन्हा सतर्क

Goa Crime: नोकऱ्यांचे आमिष दाखवून महिलांवर अत्याचार! आरोपीचे ‘हवाला कनेक्शन’ उघड; बडे मासे सापडण्याची शक्यता

Goa Mining: खाण क्षेत्र सुधारणांसाठी गोव्याला 400 कोटी! मुख्यमंत्र्यांनी मानले PM मोदींचे आभार; राज्य सरकारच्या प्रयत्नांना बळ

Goa Crime: 'राज्यात गुन्‍हे कमी, चर्चा जास्त'! DGP आलोक कुमार यांचे निरीक्षण; गुन्‍हेगारीसंदर्भातील घटना Viral होत असल्याचा दावा

Vasudev Balwant Phadke: नोकरीला लाथ मारली, अन्यायाविरुद्ध लढा उभारला, इंग्रजांना सळो की पळो केलं, पण फंद फितुरीनं घात केला; वाचा वासुदेव बळवंत फडकेंची संघर्षगाथा!

SCROLL FOR NEXT