Goa Legislative Assembly  Dainik Gomantak
गोवा

जमीन गैरव्यवहार प्रकरणात ‘त्या’ मंत्र्याला मिळणार डच्चू

बार्देश तालुक्यातील दुसऱ्या सदस्याचेही भवितव्य धोक्यात

दैनिक गोमन्तक

पणजी: काँग्रेसमधील फुटीर गटाला सत्ताधारी पक्षात सामावून घेण्यासाठी जी गणिते तयार होत आहेत, त्यामध्ये दोन मंत्र्यांना डच्चू देणे भाग आहे. या प्रक्रियेत साल्वादोर द मुंद येथील जमीन गैरव्यवहात सामील असलेल्या एका वादग्रस्त मंत्र्यावर पहिली कुऱ्हाड पडणार आहे. मंत्रिमंडळातून वगळला जाऊ शकणारा दुसरा मंत्रीही बार्देश तालुक्यातीलच आहे.

(fate of another minister of Bardesh taluka is also in danger)

काँग्रेस नेते गिरीश चोडणकर जमीन हडपप्रकरणात सतत आरोप-प्रत्यारोप करीत मुख्यमंत्र्यांना ज्या मंत्र्यांविरुद्ध आव्हान देऊ लागले आहेत, त्यांच्याबद्दलचे पुरावे आता मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याकडे पोहोचले आहेत. या मंत्र्याने दिगंबर कामत यांच्यासह भाजपात येऊ पाहणाऱ्या गटाला विरोध चालविला आहे. स्वतः गृहमंत्री अमित शहा या ‘मोरया‘ डिप्लोमसीच्या मागे असल्याने सावंत यांनी पक्षांतर्गत विरोध मोडून काढायचे ठरवले आहे.

त्यातच एका मंत्र्याविरुद्धचे भक्कम पुरावे हाती लागल्याने त्यांना अनासायास या मंत्र्याला डच्चू देणे शक्य होईल. सूत्रांच्या मते पुढच्या चार दिवसांत काँग्रेसला भगदाड पाडण्याची मोहीम फत्ते होईल. अमित शहा यांनी ही जबाबदारी मुख्यमंत्र्यांकडेच सोपविली आहे.

असे असेल गणित

काँग्रेसमधील आठजणांचा गट दोन महिन्यांपूर्वीच भाजपमध्ये सरळ दाखल होऊ शकला असता. परंतु या गटाच्या नेतृत्वाला राजकीय कौशल्य दाखविता आले नाही. सध्या या गटामध्ये दिगंबर कामत, मायकल लोबो, दिलायाला लोबो, आलेक्स सिक्वेरा, राजेश फळदेसाई व केदार नाईक यांचा समावेश असून, एक युरी आलेमाव सोडले तर संकल्प आमोणकर, रुडाल्फ फर्नांडिस, कार्लुस फरैरा व एल्टन डिकॉस्ता यांच्यापैकी दोघेजण भाजपमध्ये प्रवेश घेऊ शकतात. या प्रयत्नांना पुढच्या दोन दिवसांत यश येईल, असे भाजपातील ज्येष्ठ सूत्रांनी विश्‍वासपूर्वक सांगितले.

दिगंबर कामतांचा एकदिवसीय दिल्ली दौरा

1 दिगंबर कामत यांनी आज सोमवारी सकाळी 8.20 च्या विमानाने दिल्ली गाठली व भाजप नेत्यांशी चर्चा करून ते रात्री 9.20 वाजता गोव्यात पोहोचले.

2 अमित शहा यांनी कामत यांच्या प्रवेशाला संपूर्ण मान्यता दिल्यामुळे भाजपमधील त्यांच्या विरोधकांना शह बसला आहे.

3 ‘मी 17 वर्षांपूर्वी तुम्ही भाजप का सोडला, हा प्रश्‍न तुम्हाला विचारणार नाही. पक्षात तुमचा संपूर्ण मान राखला जाईल’, अशी ग्वाही स्वतः अमित शहा यांनी दिगंबर कामत यांना दिल्याची माहिती भाजपाच्या एका ज्येष्ठ सदस्याने आज दै. ‘गोमन्तक’ला दिली.

4 पक्षात विश्‍वजीत राणे, रोहन खंवटे व माविन गुदिन्हो यांचा नव्या गटाला प्रवेश देण्यास विरोध होता, असे सूत्रांचे म्हणणे आहे. नव्या गटातील दिगंबर कामत व आलेक्स सिक्वेरा यांना मंत्रिमंडळात सामावून घेतले जाण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

कोंकणा सेन '7 वर्ष लहान' बॉयफ्रेंड सोबत गोव्यात, डेटिंगच्या चर्चांना उधाण; सोशल मीडियावर Photos Viral

Verna Accident: वेर्णा येथे चार वाहनांचा विचित्र अपघात; जिवितहानी टळली

Rama Kankonkar Assault: सामाजिक कार्यकर्ते रामा काणकोणकर यांच्यावर सहाजणांकडून जीवघेणा हल्ला; हल्लेखोर फरार

घटस्थापनेला नवनिर्वाचित समितीकडे पदभार, 'GCA'च्या नव्या पदाधिकाऱ्यांकडून विकासाची अपेक्षा

ट्रेन रुळावरुन घसरली तर पुन्हा रुळांवर कशी आणली जाते? प्रत्यक्ष व्हिडिओ पाहा Watch

SCROLL FOR NEXT