Goa Accident at Pernem  Dainik Gomantak
गोवा

Goa Accident : पुण्यातून गोव्यात येणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला

तोरसे येथे ट्रक आणि कारचा भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Accident : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर तोरसे पेडणे येथे ट्रकची कारला जोरदार धडक बसल्याने अपघात झाला आहे. या अपघातात एका महिलेसह दीड वर्षांच्या मुलीचा जागीच मृत्यू झाला आहे. तर अपघातात तिघे गंभीररित्या जखमी झाले आहेत. अपघातग्रस्त वाहनातील कुटुंब पुण्यातून गोव्यात येत असल्याची प्राथमिक माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार पुण्यातून कार घेऊन गोव्यात पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या गाडीला तोरसे पेडणे येथे भीषण अपघात झाला. गोव्यातून मासे घेऊन हा ट्रक महाराष्ट्राच्या दिशेने जात होता, तर पुण्यातून पर्यटकांची कार गोव्याकडे येत होती. तोरसे पेडणे येथे झालेल्या अपघातात पुण्याच्या गुंदेजा परिवारातील एका महिलेसह चिमुकल्यालाही आपला जीव गमावावा लागला आहे.

या अपघातात गंभीर जखमी झालेल्या अन्य दोघांना तातडीने गोवा मेडिकल कॉलेजमध्ये उपचारांसाठी हलवण्यात आलं आहे. हा अपघात एवढा भीषण होता की कारचा पूर्ण चक्काचूर झाला. तसंच ट्रकच्या दर्शनी भागाचही अपघातात मोठं नुकसान झालं आहे. गेल्या काही वर्षांपासून मुंबई-गोवा महामार्गाचं काम सुरु आहे. मात्र दिशादर्शक आणि सूचना फलकांच्या अभावामुळे वारंवार या भागात अपघात होत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. धोकादायक जंक्शनवर पोलीस तैनात करावेत, तसंच मार्गदर्शक फलकही तातडीने लावण्याची मागणी केली जात आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Land Dispute Case: जमिनीच्या वादातून खुनाचा प्रयत्न, पोलिसांकडून दोघांना अटक; वाचा नेमकं प्रकरण?

Goa Live Updates: गोव्याला शैक्षणिक हब बनण्यासाठी सरकार काम करतेय: CM प्रमोद सावंत

Goa Tourist: महाराष्ट्रातील पर्यटकांचा गोव्यात धुडगूस; भर रस्त्यात हाणामारी, व्हिडिओ व्हायरल

Goa News: डिपॉझिट रिफंड योजनेवरुन 'गोवा कॅन'चा धोक्याचा इशारा! विक्रेते व ग्राहकांमध्ये तंटा होण्याची वर्तवली शक्यता

Mormugao Fort: ऐतिहासिक 'मुरगाव किल्ल्याचे' होणार पुनर्निर्माण! मुख्यमंत्री सावंतांनी गुणवत्तापूर्ण कामाचा दिला विश्वास

SCROLL FOR NEXT