Ponda Accident Dainik Gomantak
गोवा

Ponda Accident: फोंड्यात भीषण अपघात! राष्ट्रीय महामार्गावर ट्रकची दुचाकीला जोरदार धडक; पती ठार, पत्नी गंभीर जखमी

Ponda Accident News: फोंडा येथील कदंब बस स्टॅण्डजवळील राष्ट्रीय महामार्गवर ट्रक आणि दुचाकी यांच्यात आज संध्याकाळी 5.00 च्या सुमारास भीषण अपघात झाला.

Manish Jadhav

Fatal Accident Near Ponda Kadamba Bus Stand One Dead One Injured

फोंडा: राज्यात गेल्या काही दिवसांत पुन्हा एकदा अपघातांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. सातत्याने अपघाताच्या घटना समोर येत आहेत. यातच, शुक्रवारी (7 मार्च) फोंड्यातून अशीच एक थरकाप उडवणारी अपघाताची घटना समोर आली. ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली, ज्यामध्ये दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला.

राष्ट्रीय महामार्गावर ट्रकची दुचाकीला जोरदार धडक

फोंडा येथील कदंब बस स्टॅण्डजवळील राष्ट्रीय महामार्गवर ट्रक आणि दुचाकी यांच्यात आज संध्याकाळी 5.00 च्या सुमारास भीषण अपघात झाला. दुचाकीला ट्रकची धडक बसल्याने दुचाकीवरील पती-पत्नी गंभीर जखमी झाले. या अपघातात एकनाथ शेटकर (वय 67) हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना नजीकच्या रुग्णालयात हलवण्यात आले, परंतु तिथेच त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले, तर त्यांची पत्नी सुलोचना शेटकर गंभीर जखमी असून त्यांना बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात तातडीने हलवण्यात आले आहे.

पेंटींग कंत्राटदार चंदकिशोर यांचा जागीच मृत्यू

दरम्यान, फोंड्यात मंगळवारी (4 मार्च) दुपारी 2.30 च्या सुमारास झालेल्या अपघातात पेंटींग कंत्राटदार चंदकिशोर नानगावा (वय 55) जीव गमवावा लागला. पेन्टिंगचे काम करण्यासाठी फोंड्याहून उसगांवच्या दिशने जात असताना त्यांचा हा अपघात झाला. चंदकिशोर यांचा अपघातात मृत्यू झाल्याची माहिती त्यांच्या साथीदारांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assmbly Live: डिलिव्हरी एजन्सी वापरत असलेल्या वाहनांवर इतर राज्यांच्या नोंदणी प्लेट

नातं वाचवण्यासाठी करिश्मा-संजयची गोवा ट्रीप! करीनाचा खुलासा चर्चेत, म्हणाली, 'त्यांना समस्या होत्या'

Sara Tendulkar: 1137 कोटी… सचिनच्या लेकीचा 'मास्टरस्ट्रोक', पर्यटनाला चालना देण्यासाठी करणार काम

IND vs ENG: रोहित-विराटला जमलं नाही ते शुभमन गिल करुन दाखवणार, ओव्हलवर इतिहास रचण्याची संधी; पहिल्यांदाच घडणार 'हा' पराक्रम

मुख्यमंत्र्यांनी करुन दाखवलं, ग्रामसेवकावर Strict Action; सरदेसाईंकडून प्रमोद सावंतांचे कौतुक, रायच्या 'सायको' सचिवाचीही केली तक्रार

SCROLL FOR NEXT