Electric SUV Fatal Accident At Porvorim Goa Dainik Gomantak
गोवा

Porvorim Accident: ताबा सुटला अन् घात झाला; भरवेगाचे तीन बळी

Fatal Accident At Porvorim: पर्वरीतील कार अपघातात एका महिलेसह तिघांचा जागीच मृत्यू

दैनिक गोमन्तक

Fatal Accident At Porvorim: राज्यात वाहनचालकांच्या बेपर्वाईमुळे रस्ते अपघातांची संख्या वाढतच चालली आहे. पर्वरीत महामार्गावर चालकाचा भरधाव कारवरील ताबा सुटल्याने कार रस्त्यालगतच्या झाडावर आदळली.

या अपघाताची भीषणता इतकी होती की, एका महिलेसह तिघेजण जागीच ठार झाले. ही दुर्घटना शनिवारी रात्री १.३०च्या सुमारास घडली. या अपघातातील दोघेजण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर गोमेकॉत उपचार सुरू आहेत.

या स्वयंअपघातात कारचालक शॉन फर्नांडिस (रा. पर्रा, वय २७ वर्षे), वाल्ड्रोफ डिसोझा (रा. हणजूण, वय ३० वर्षे) आणि अ‍ॅबिगेल डिसोझा (रा. मेरशी, वय २१ वर्षे) या तिघांचा मृत्यू झाला.

तर, फिओना डिसोझा (रा. मेरशी, वय २५ वर्षे) आणि निनोश्का फर्नांडिस (रा. हणजूण, वय २१ वर्षे) हे दोघे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी गोमेकॉत दाखल केले आहे.

या अपघाताचा पंचनामा हवालदार विवेक तोरस्कर यांनी केला. तसेच पुढील चौकशी पर्वरी पोलिस स्थानकाचे उपनिरीक्षक भंडारी हे करीत आहेत.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून किनारपट्टी भागात मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्यांविरुद्ध कारवाईला सुरुवात केली आहे. रात्री संगीत पार्ट्यांच्या ठिकाणी वाहतूक पोलिस तैनात केले आहेत.

यावर्षी आतापर्यंत ९८० मद्यधुंद चालकांवर कारवाई केली आहे. गेल्या वर्षी याच काळात ७९५ मद्यपींविरुद्ध कारवाई झाली होती. मद्यपान करून वाहन चालवणाऱ्यांची संख्या वाढत असल्याने ही कारवाई अधिक कठोर केली जाईल.

काहींचे परवाने निलंबित करण्यासाठी वाहतूक खात्याकडे शिफारस केली आहे, अशी माहिती वाहतूक पोलिस अधीक्षक अक्षत कौशल यांनी दिली.

दार निखळताच ‘तो’ बाहेर फेकला गेला

या भीषण अपघातात कारचालक शॉन, तर पाठीमागील सीट बसलेले वाल्ड्रोफ आणि अ‍ॅबिगेल हे तिघेजण जागीच ठार झाले. तर, कारमधील फिओना आणि निनोश्का हे पुढील सीटवर बसलेले दोघेजण गंभीर जखमी झाले.

हा अपघात इतका भीषण होता की, कारचे पाठीमागील दार निखळून पडले आणि कारमधील वाल्ड्रोफ हा जोरात बाहेर फेकला गेल्याने तो जागीच मरण पावला. या अपघाताचा पंचनामा पर्वरी पोलिसांनी केला.

अन् कारची दिशाच बदलली

पर्वरीत डेल्फिनो स्टोअरच्या पाठीमागील बाजूला असलेल्या टीव्हीएस शोरुमजवळ रात्री १.३०च्या सुमारास ही कार पोहोचली असता, चालक शॉन याचा गाडीवरील ताबा सुटल्याने ती महामार्गावरील उजव्या बाजूला असलेल्या झाडावर जोरात आदळली.

या कारची धडक इतकी जबरदस्त होती, की कारचे तोंड फिरून पुन्हा पणजीच्या दिशेने झाले. यात कारचा चक्काचूर झाला.

मद्यपान केले की नाही?

कारचालक शॉन हा मद्यधुंद अवस्थेत कार चालवत होता. त्यामुळे वाहनावरील नियंत्रण सुटल्याची चर्चा लोकांमध्ये आहे. तिन्ही मृतदेह गोमेकॉत असून शवचिकित्सा झालेली नाही. मृतांच्या कुटुंबीयांनी शवचिकित्सा सोमवारी (४ सप्टेंबर) करण्याची विनंती केली आहे. त्यामुळे शवचिकित्सेनंतरच चालक शॉन फर्नांडिस याने मद्यप्राशन केले होते की नाही, याचा उलगडा होईल.

सर्वजण नात्यातील

कारमधील सर्वजण एकमेकांचे नातेवाईक असून, ते मेरशीहून म्हापशाच्या दिशेने जात होते. शनिवारी रात्री (जीए-०३-झेड-७७९०) या क्रमांकाची इलेक्ट्रिक कार (ईव्ही) भरधाव असल्याने ती नियंत्रणात आणणे कारचालकाला जमले नसल्याने हा अपघात घडल्याचे प्रथमदर्शनी सांगण्यात आले. यातील मृत वाल्ड्रोफ हा कारचालक शॉन फर्नांडिस याचा भावोजी तर, अ‍ॅबिगेल ही चुलत बहीण होती. अपघाताचे हे वृत्त समजताच मृतांच्या पर्रा, हणजूण, मेरशी या गावांवर शोककळा पसरली. शवविच्छेदन सोमवारी करण्यात येणार आहे.

"राज्यात मद्यधुंद अवस्थेत वाहने चालवणे सुरूच आहे. त्यामुळे जीवघेणे अपघात घडत आहेत. शिवाय काळ्या काचेच्या गाडीतून मृतदेह सीमेपलीकडे घेऊन गेले तरी पोलिसांना त्याची माहिती नसते. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आता तरी जबाबदारी निश्चित करणार की, दोषारोपाचा खेळ सुरूच ठेवणार?"

युरी आलेमाव, विरोधी पक्षनेते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shubman Gill Century: शुभमन गिलचा धमाका! ठोकलं बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय

Camel Tear: उंटाचे अश्रू सापाच्या विषावर गुणकारी, एक थेंब 26 सापांच्या विषावर ठरेल जालीम औषध; अभ्यासातून स्पष्ट

CO2 To Alcohol: विज्ञानाचा चमत्कार! कार्बनचे अल्कोहोलमध्ये रुपांतर करण्यात कोरियाच्या वैज्ञानिकांना यश

Anaya Bangar: 'पुरुषाच्या देहात एक कोमल स्त्री जगत होती'; अनाया बांगरने जागवल्या लिंगबदल काळातील नाजूक आठवणी

Goa Crime: पार्किंगचा वाद विकोपाला गेला, पर्ये सत्तरीत दोन तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी; एकाला अटक

SCROLL FOR NEXT