Fatal accident at Quepem Pedamol Dainik Gomantak
गोवा

Goa Accident: अपघात नव्हे तो खूनच! देऊमळ ग्रामस्थांची केपे पोलिस स्थानकावर धडक

गोमंतक ऑनलाईन टीम

केपे: काल रात्री पडामळ केपे येथे भरधाव आलेल्या चारचाकी वाहनाने रस्त्यालगत पार्क केलेल्या तीन दुचाकींना जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात अब्दुल कादर बादशाह (२६) देऊमळ- केपे या युवकाचा जागीच मृत्यू झाला तर सुफियान शेख (२७) देऊमळ-केपे हा गंभीर जखमी झाला.

जखमीला गोमेकॉत दाखल केले असून या अपघातातून दैव बलवत्तर होते म्हणून तीन युवक थोडक्यात बचावले. याप्रकरणी केपे पोलिसांनी कार चालक रुबर्ट थॉमास डायस (२१) कट्टा आमोणा व आणखी दोघांना अटक केली आहे. दरम्यान, सदर कारमध्ये गांजासदृष्य वस्तू आढळल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले.

केपे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवार, २० रोजी रात्री ११.३० वा. पडामळ केपे येथे अब्दुल कादर, सुफियान शेख व आणखी तीन युवक मिळून पाचजण एका कार्यक्रमाला गेले होते. सदर कार्यक्रम आटोपून ते घरी परतण्याच्या वाटेवर काही वेळ थांबले असता रुबर्ट डायस कार घेऊन भरधाव आला व त्याने रस्त्यालगत पार्क केलेल्या तीन दुचाकींना जोरदार धडक दिली.

यावेळी अब्दुल हा आपल्या स्कूटरवर बसला होता, पाठीमागून जोरदार धडक बसल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला तर त्याला लागूनच उभ्या असलेल्या सुफियान शेख यांनाही जोरदार धडक बसल्याने त्याचे दोन्ही पायांना गंभीर इजा झाली. बाकीच्यांनी प्रसंगावधान राखून बाजूला उडी घेतल्याने ते या अपघातातून थोडक्यात बचावले.

अपघात नव्हे खूनच !

या अपघातास सर्वस्वी कारचालक जबाबदार असून हा अपघात नसून हा खून आहे, असे सांगून आरोपीवर कडक कारवाई करावी, अशी मागणी करून आज सकाळी देऊमळ येथील ग्रामस्थांनी केपे पोलिस स्थानकावर धडक दिली.

यावेळी नगरसेवक प्रसाद फळदेसाई यांनी सांगितले, की एका निष्पाप तरुणाचा बळी गेल्याने त्याला न्याय मिळालाच पाहिजे.

मृत अब्दुल याला लहान मूल असून कुटुंबातील एकुलती एक कमावती व्यक्ती गेल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून या अपघाताची सखोल चौकशी करून आरोपींना कडक शिक्षा द्यावी तसेच अब्दुलच्या कुटुंबाला सरकारने न्याय द्यावा, असेही फळदेसाई म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Table Tennis Championship: अंकुर, सुतिर्थाची कमाल! यूटीटी राष्ट्रीय मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत मारली बाजी; विजेतेपदावर कोरले नाव

Goa University: ''गोवा विद्यापीठातील ती पदे भरु देणार नाही, कुलगुरुंनी अद्याप...''; सरदेसाईंच्या पक्षाचा आक्रमक पवित्रा

Goa Fire: मालक बाहेर पडला अन् फ्लॅटमधून धूर येऊ लागला; सिलिंडर बाहेर काढल्याने मोठी दुर्घटना टळली

Global Konkani Forum Protest: साहित्य अकादमींच्या कार्यक्रमांवर बहिष्कार; गोव्यातल्या कोकणी फोरमने टोकाचा निर्णय का घेतला?

Goa News: अंकुर, सुतीर्थ यांचा जलवा, टेबल टेनिसनमध्ये पटकावले विजेतेपद; वाचा दिवसभरातील घडामोडी

SCROLL FOR NEXT