Goa Cashew Farmers Dainik Gomantak
गोवा

Goa Cashew Farmers: काजू उत्पादनात घट! राज्यातील शेतकरी चिंतातुर, हमीभाव वाढवण्याची मागणी

Goa Cashew Farmers: राज्यातील सत्तरी, सांगे, काणकोण, तसेच इतर भागात मोठ्या प्रमाणात शेतकरी काजूचे उत्पादन घेत असतात.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Cashew Farmers

गोवा हे काजू उत्पादनातील एक महत्त्वाचे राज्य असून काजूने गोव्याला वेगळी ओळख मिळवून दिली आहे. राज्यात येणारे पर्यटक परतताना आवर्जून काजू खरेदी करतात. परंतु या काजूने यंदा राज्यातील शेतकऱ्यांना चिंतेत पाडले आहे.

राज्यातील सत्तरी, सांगे, काणकोण, तसेच इतर भागात मोठ्या प्रमाणात शेतकरी काजूचे उत्पादन घेत असतात. अनेक शेतकऱ्यांची कुटुंबे या उत्पन्नावर चालत असतात पंरतु यंदा पिकात मोठ्या प्रमाणात घट झाल्याने शेतकऱ्यांवर बिकट संकट ओढवले आहे. त्यामुळे राज्यातील शेतकरी चिंतातूर असून सरकारकडे आशेने पाहात आहे.

यंदा पिकात मोठ्या प्रमाणात घट झाल्याने त्यातून सावरण्यासाठी शेतकऱ्यांना देण्यात येणारा हमीभाव १५० वरून किमान २५० रुपये करावा यासाठी काजू उत्पादक शेतकरी मागणी करत आहेत.

राज्यातील कृषी संचालनालय तसेच कृषीमंत्री रवी नाईक याबाबतीत योग्य निर्णय घेतील अशी आशा शेतकऱ्यांना आहे.

फेणी, हुर्राक गाळपावरही परिणाम

काजू पीक मोठ्या प्रमाणात आले नसल्याने त्याचा परिणाम फेणी, हुर्राक गाळपावर देखील झाला असून अनेक व्यावसायिकांना शेजारील कर्नाटक तसेच महाराष्ट्रातून बोंडू आणून हुर्राक, फेणी गाळप करावे लागत आहे.

त्यामुळे येत्या काळात फेणीच्या दरात वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. गोवा वेधशाळेने राज्यात सोमवारपासून पाऊस पडणार असल्याच्या शक्यता वर्तविली आहे. पाऊस तुरळक प्रमाणात पडला तर काही प्रमाणात चांगले पीक येण्याची शक्यता आहे.

परंतु राज्यात ज्या प्रमाणे उष्मा वाढत आहे, तसाच जर तो कायम राहिला तर मोठ्या प्रमाणात नुकसान होणार असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे.

"राज्यात यंदा काजूचे पिकात घट झाली आहे. निसर्ग चक्रासमोर सर्व उपाय फिके पडतात. येत्या काळात जर पाऊस पडला तरी तसा मोठा उत्पादनात वाढ होईल असे वाटत नाही. यंदाही काजूला प्रती किलो १५० रुपये हमीभाव आहे," असे कृषी संचालक नेव्हील आल्फोन्सो म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa LPG Advisory: एलपीजी ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; गोवा सरकारकडून अ‍ॅडवायझरी जारी

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

IND Vs ENG: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये टीम इंडियाने रचला इतिहास, परदेशी भूमीवर केली दमदार कामगिरी; कांगारुंचा मोडला रेकॉर्ड

Goa News Live: अडवलपालमध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा, 'फोमेंतो' कंपनीच्या रिजेक्शनमुळे समस्या

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

SCROLL FOR NEXT