शेतीसाठी आता खंदकातील पाणी! दोन-तीन दिवसांत पुरवठा, धाट सांगोड येथील शेतकरी खुशीत

Goa Farmers: कुळे येथील धाट सांगोड भागातील शेतकऱ्यांना आता खनिज खंदकातील पाणी पुरवण्यात येणार आहे.
Goa Farm
Goa FarmDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Farm

कुळे येथील धाट सांगोड भागातील शेतकऱ्यांना आता खनिज खंदकातील पाणी पुरवण्यात येणार आहे. जलस्रोत खात्याने नवीन पंप तसेच जलवाहिनी घालण्याचे काम सुरू केले असून येत्या दोन तीन दिवसांत पाणी पुरवठा सुरू होणार आहे. आमदार गणेश गांवकर यांच्या प्रयत्नामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

मिळालेल्या माहिती प्रमाणे सांगोड या भागात अनेक शेतकरी वायंगण शेती करतात. या शेतकऱ्यांना कुळे येथून येणाऱ्या खांडेपार कालव्यातून पाणी पुरवण्यात येते, परंतु गेल्या काही वर्षांपासून हा कालवा पाझरत असल्याने शेतीला पुरेसे पाणी मिळत नव्हते.

त्यामुळे शेतकरी हैराण होते. शेतकऱ्यांनी याबाबत आमदार गणेश गांवकर यांना सविस्तर माहिती दिली व शेतीसाठी जवळच असलेल्या खनिज खंदकातील पाणी कालव्यात सोडण्याची विनंती केली.

त्यानुसार आमदार गांवकर यांनी जलस्रोत खात्याच्या अधिकाऱ्यांना याची माहिती देऊन खंदकातील पाणी पंपाव्दारे खेचून कालव्यातून शेतकऱ्यांना पुरवण्यास सांगितले.

Goa Farm
Goa Tourism: गोव्याच्या ‘पर्यटन’ला डिजिटल प्रचाराचे पाठबळ; ‘अगोडा’शी सामंजस्य करार

जलस्रोत खात्यामार्फत काम सुरू

खनिज खंदकातील पाणी खेचण्यासाठी नवीन पंप व जलवाहिनी घालण्याचे काम जलस्रोत खात्याने हाती घेतले आहे. सध्या शेतकऱ्यांना खांडेपार नदीतील पाणी कालव्यातून पुरवण्यात येते. याच कालव्यात खंदकातील पाणी सोडण्यात येणार आहे, त्यामुळे शेतीसाठी मुबलक पाणी उपलब्ध होईल, अशी माहिती जलस्रोत खात्याचे अभियंता सदानंद नाईक यांनी दिली.

सांगोड येथील शेतकऱ्यांचा प्रश्न आपण व सरपंच वामन गांवकर यांनी आमदार गणेश गांवकर यांच्याजवळ मांडला होता. त्यांनी लगेच याची दखल घेत जलस्रोत खात्यामार्फत ही समस्या सोडवण्यास पुढाकार घेतला. येत्या दोन तीन दिवसांत खंदकातील पाणी कालव्यात सोडवण्यात येणार आहे. त्यामुळे शेतीला मुबलक पाणी मिळेल, असे पंच विठोबा मळेकर म्हणाले.

Goa Farm
Goa AAP: का झाला कुजिरातील मुलांत वाद? आम आदमी पक्षाने सांगितले कारण

"गेल्या काही दिवसांपासून खांडेपार कालव्यातील पाणी पुरवठा कमी झाला होता. त्यामुळे सांगोड भागात शेतकरी हतबल होते. आमदार गणेश गांवकर यांनी पुढाकार घेउन शेतीसाठी खंदकातील पाणी पुरवण्याच्या कामाला सुरवात केली आहे. त्यामुळे मुबलक पाणी मिळेल अशी अपेक्षा आहे. परंतु चर खोदून खंदकातील पाणी कालव्यात सोडण्यापेक्षा स्वतंत्र जलवाहिनी घालून पाणी पुरवठा करणे योग्य ठरले असते, जेणे करून कालव्यातून पाझरून पाण्याची होणारी नासाडी टळली असती," असे शेतकरी दिलीप सांगोडकर म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com