Goa IIT Dainik Gomantak
गोवा

Goa IIT च्या धास्तीने 10-12 वर्षे पडीक जमिनी फुलू लागल्या

दैनिक गोमन्तक डिजिटल

Goa IIT in Sanguem: पाणी नाही, कुंपण नाही म्हणून गेल्या 10-12 वर्षांपासून शेती व्यवसायाकडे पाट फिरवणाऱ्या आणि सांगे आयआयटी प्रकल्पाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांनी शेती करण्यासाठी हातात पावडा घेत मशागत करण्यासाठी प्रारंभ केला आहे. त्यामुळे या परिसरातील धास्तीने जमिनी फुलू लागल्या आहेत.

(Farmers in Saguem have started farming on waste land to oppose IIT)

शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार सांगे परीसरातील शेतीला साळावली धरणाचे पाणी कालव्याद्वारे जानेवारी पहिल्या आठवड्यात पुरविण्यात येत असे. पण यंदा जलसंपदा मंत्री सुभाष शिरोडकर यांनी राज्यभरात शेतीसाठी पुरवठा करणाऱ्या सर्व उपसा जलसिंचन योजना पंधरा नोव्हेंबर पासून प्रारंभ केल्याने पाणी शेतीला मिळू लागले आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग सुखावला आहे.

नागवे, वरकटो भागातील शेतीला पाणी पुरवठा सुरु

नागवे, वरकटो भागातील शेतीला पाणी पुरवठा वेळेवर होत नसल्यामुळे व मोकाट गुरांचा त्रास होत असल्याचे कारण पुढे करत शेतीकडे पाट फिरवणाऱ्या शेतकऱ्यांनी जलसंपदा मंत्री सुभाष शिरोडकर यांना निवेदन सादर करत शेतीला पाणी पुरवठा लवकर करण्यात यावा अशी मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर हा पाणी पुरवठा करण्यात आला.

आयआयटी साकारल्यास आपली शेत जमीन जाणार

आयआयटी साकारल्यास आपली शेत जमीन जाणार या भीतीने शेतकरी चलबिचल झाले होते. यात शेती केली जात असल्यास एक तरी दाणा दाखवा हे वाक्य शेतकऱ्यांच्या जिव्हारी लागल्याने यंदा कोणत्याही परिस्थितीत शेती लागवड करावी या हेतूने ओसाड पडलेल्या शेत जमिनीत यंदा भातशेती करण्याच्या इराद्याने जमिनीचीं मशागत सुरुवात करण्यात आली आहे.

या बाबत माहिती देताना शेतकरी मिल्टन फेर्नांडिस म्हणाले की, केवळ भात शेती म्हणजेच शेती नसून बागायती, काजू लागवडही सुद्धा बागायती आहे. सरकार स्वस्त आणि मोफत तांदूळ पुरवठा करू लागल्याने काही प्रमाणात शेतकरी आळशी बनले होते. आता मात्र गप्प बसून राहणे परवडणारे नसल्याने शेतकरी आपल्या मशागतीला लागले आहेत. काही दिवसानंतर ओसाड जमिनीवर हिरवेगार शेत लागवड झालेली पाहायला मिळेल असा विश्वास ही त्यांनी व्यक्त केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

गोव्यातील पोर्तुगीजकालीन पूलांचे होणार 'स्ट्रक्चरल ऑडिट'; सावंत सरकारचा निर्णय

Goa Government Schools: ...गेल्या 5 वर्षांत ट्रेंड बदलला, शासनाचे सरकारी शाळांना प्राधान्य; CM सावंत

Goa Today's News Live: गोव्यातील सर्व धर्मियांमध्ये संत फ्रान्सिस झेवियर यांचा DNA; मंत्री सिक्वेरा

SCROLL FOR NEXT