Valpoi Agriculture Divisional Office Survey Dainik Gomantak
गोवा

Sattari: सत्तरीत नुकसान सर्वेक्षण सुरू; ५५ अर्ज दाखल

Valpoi Agriculture Divisional Office Survey: सुमारे ३० बागायतदारांच्या जागेत जाऊन पाहणी करुन अहवाल लिहून घेतलेला आहे

गोमन्तक डिजिटल टीम

वाळपई: सत्तरी तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सोसाट्याच्या वाऱ्यासह कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकरी व बागायतदारांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त बागायतदारांनी वाळपई कृषी विभागीय कार्यालयात भरपाई मिळावी म्हणून अर्ज करण्यास सुरूवात केली आहे. आतापर्यंत सत्तरी तालुक्यातून जवळपास ५५ जणांनी अर्ज दाखल केले असून त्यांचे सर्वेक्षण गेल्या चार दिवसांपासून हाती घेण्यात आले आहे.

गेल्‍या सोमवारपासून सर्वेक्षणाचे काम जलदगतीने हाती घेण्‍यात आले आहे. सुमारे ३० बागायतदारांच्या जागेत जाऊन पाहणी करुन अहवाल लिहून घेतलेला आहे. वाळपई कृषी खात्‍याचे अधिकारी विश्‍‍वनाथ गावस व त्यांचे सहकारी दिवसभर राबून सर्वेक्षणाचे काम करत आहेत.

नदीच्या पात्रात बांधलेल्या बंधाऱ्यात जंगली झाडांची लाकडे अडकून पडलेली आहेत. त्‍यामुळे पाण्‍याच्‍या प्रवाहाला अडथळा होऊन ते तुंबून जवळच्‍या बागायतीत, शेतात शिरते. त्‍यामुळे नुकसान होत आहे. म्हणूनच सरकारने या बंधाऱ्याचे योग्य व्यवस्थापन करावे अशी मागणी वेळूसचे नागरिक रामा गावकर यांनी केली आहे. वेळूस भागात वारंवार नदीचे पाणी बागायतींत घुसते. त्यामुळे दरवर्षी आम्हाला फटका बसतो, असे ते म्‍हणाले.

औषध फवारणीअभावी सुपारीवर संक्रांत

जून, जुलै महिन्यात सुपारी पिकावर औषधाची फवारणी केली जाते. यावर्षी मुसळधार पावसामुळे ती वेळेत करता आली नाही. ही औषध फवारणी तीस दिवसांच्या फरकाने दोन-तीन वेळा केली जाते. पण यावर्षी जून, जुलै महिन्यात पावसाने कहरच केल्याने फवारणी झालीच नाही. त्‍यामुळे आता सुपारी फळाची गळती होण्यास प्रारंभ झाला आहे. म्हणूनच सरकारने सुपारी पिकासाठीही नुकसान भरपाई योजना सुरू करण्याची मागणी बागायतदार करत आहेत.

गेल्‍या सोमवारपासून चार दिवस सातत्याने नुकसानीच्‍या सर्वेक्षणाचे काम करण्‍यात आले आहे. केरी, नगरगाव भागातील नुकसानग्रस्त लोकांच्या पीक, बागायतींच्‍या नुकसानीची माहिती जाणून घेतली आहे. त्याचा अहवाल आता सरकार दरबारी सादर केला जाईल.
विश्‍‍वनाथ गावस, कृषी अधिकारी (वाळपई)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asia Cup 2025: आशिया कपसाठी पाकिस्तानने जाहीर केला संघ, बाबर-रिझवानला डच्चू; 'या' खेळाडूंना मिळाली संधी

Kshatriya Origins: बटाडोम्बा-लेना, फा-हियन गुहेतील 30000 ईसापूर्वीचे होमिनिन सांगाड्याचे अवशेष, वेदरांचा उल्लेख

Video Viral: मडगावच्या दहीहंडीत आला 'पुष्पा'! "झुकेगा नही" म्हणत त्याने काय केलं, बघा...

Opinion: 3500 ईसापूर्व काळात सुमेरियन लोकांनी ‘क्यूनिफॉर्म’ लिपी विकसित केली, छापखान्याच्या शोधामुळे वाचनकलेत क्रांती झाली

Goa Live News: मोर्ले सत्तरी येथील वासू मोरजकर यांचे मुसळधार पावसामुळे मोठे नुकसान

SCROLL FOR NEXT