Sanjivani Sugar Factory Dainik Gomantak
गोवा

Sanjivani Sugar Factory: संजीवनी पुनरुज्जीवनासाठीचा अहवाल शीतपेटीत; कारखाना सुरू होणार का?

Sanjivani Sugar Factory: डेक्कन शुगर टेक्नॉलॉजीस असोसिएशनने हा तांत्रिक आर्थिक व्यवहार्यता अहवाल तयार केला होता

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: धारबांदोडा येथील बंद पडलेला संजीवनी सहकारी साखर कारखाना पुन्हा सुरू करण्यासाठी चार वर्षांपूर्वी अहवाल तयार करवून घेतला खरा; मात्र तो अहवाल शीतपेटीत टाकल्याने सरकार याविषयी गंभीर नसल्याची ऊस उत्पादक शेतकऱ्यांची भावना झाली आहे. पुणे येथील डेक्कन शुगर टेक्नॉलॉजीस असोसिएशनने हा तांत्रिक आर्थिक व्यवहार्यता अहवाल तयार केला होता. त्यामुळे यापुढे कधी हा कारखाना सुरू होणार का, याविषयी प्रश्न निर्माण झाला आहे.

यंदा नुकसान भरपाई देण्याचे शेवटचे वर्ष असल्याने पुढील वर्षी काय होणार, ही चिंता शेतकऱ्यांना भेडसावू लागली आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सरकारने माजी खासदार ॲड. नरेंद्र सावईकर यांच्या अध्यक्षतेखाली सुविधा समिती नेमण्यात आली. तीही आता मदत करत नसल्याची भावना शेतकऱ्यांत बळावली आहे.

या कारखान्याच्या जमिनीत ऊस लागवडीचाही यशस्वी प्रयोग केला आहे. ऊस उत्पादक शेतकरी ऊस लागवड करत आहेत, ऊसाखालील क्षेत्र वाढीसाठीही प्रयत्न हवेत. नव्या तंत्रज्ञानाच्या कारखान्यामुळे गाळपाचा खर्च कमी होऊन उताराही वाढू शकतो. अर्थात याचे निर्णय सरकारी पातळीवर झाले पाहिजेत, असे मत कारखान्याच्या सुविधा समितीचे अध्यक्ष ॲड. नरेंद्र सावईकर यांनी व्यक्त केले.

चार वर्षांपूर्वीच्या अहवालातील शिफारशी अशा...

१. दर हंगामात १ ते सव्वालाख मेट्रीक टन ऊस उपलब्ध कऱण्यासाठी ३-४ वर्षांत कार्यक्रम राबवावा.

२. कारखान्यातील सध्याची यंत्रणा २-३ वर्षे सुरू ठेवावी. त्यानंतर ती दुरुस्त करावी.

३. काऱखान्यात ७०० मेट्रीक टन क्षमतेची नवी यंत्रणा बसविण्यासाठी खरेदी सप्टेंबर २०२२ मध्ये सुरू करावी.

४. नवी यंत्रे युद्धपातळीवर बसवावीत. जेणेकरून त्यातून इथेनॉल व एक्स्ट्रा न्युट्रल अल्कोहोल तयार करता येईल.

५. ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून ऊस खरेदी केल्यानंतर पंधरवड्यात त्यांना पैसे अदा करावेत.

६. इथेनॉलसाठी ४५ किलोलीटर्स क्षमतेची डिस्लीटरी सुरू करावी.

७. शेतकऱ्यांना सीओएम ०२६५ या जुनाट बियाण्याऐवजी सीओएम ९०५७ बियाणे पुरवावे.

८. शेतकरी सी ८६०३२, सीओ ९२००५ आदी बियाण्यांचा वापर केला जातो, तो थांबवावा.

कारखाना सुरू करण्यासाठी अहवाल दिल्यानंतरची कार्यवाही सरकारने केली पाहिजे. इथेनॉलची जोड दिल्याशिवाय कारखान्याचा खर्च निघू शकणार, ही वस्तुस्थिती आहे. शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या आहेत.
ॲड. नरेंद्र सावईकर, अध्यक्ष, सुविधा समिती
संजीवनी कारखाना कष्टकरी शेतकऱ्यांचा आधारवड होता. या आशेवर शेतकरी राहिले. त्यांच्या पदरी निराशा पडली आहे. सरकारने अद्यापही कारखाना आणि इथेनॉल निर्मिती केल्यास शेतकरी पुन्हा ऊस शेतीकडे वळतील.
चंदन उनंदकर, शेतकरी

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: गोवा विद्यापीठातील शिक्षकेतर कर्मचारी अजूनही दिवाळी बोनसच्या प्रतीक्षेत

Ranji Trophy: गोवा सलग चौथा विजय मिळवणार का? मिझोरमविरुद्ध पारडे जड; नवीन चेहऱ्यांना संधी

'Cash For Job Scam' केसमधील 'हाय-फाय प्रियाचे' कारनामे होणार उघड! अनेक महिलांकडून उकळले पैसे

Russian in Goa: रशियन आले हो! हंगामाच्या पहिल्या चार्टरने 334 पर्यटक गोव्यात दाखल

'Cash For Job Scam'चे आणखी एक प्रकरण उघड! निवृत्त नौदल कर्मचाऱ्याच्या मुलाकडून 6 लाख उकळले

SCROLL FOR NEXT