rice harvest
rice harvest dainik gomantak
गोवा

Rice farming: शेतकरी भात कापणी यंत्राच्या प्रतीक्षेत

गोमन्तक डिजिटल टीम

Rice farming तिळारी सिंचनाच्या पाण्याच्या उपलब्धतेचा लाभ घेत गिरी येथील एका सेवानिवृत्त सरकारी कर्मचाऱ्याने भातशेती पिकवली, पण कापणी यंत्रांच्या अनुपलब्धतेमुळे भात पीक काढण्यासाठी त्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

गिरी गावातील दिलीप लोटलीकर या शेतकऱ्याने रब्बी हंगामात सुमारे 2000 चौरस मीटर क्षेत्रात भातशेती केली आहे. आणि तिळारी सिंचन कालव्याच्या सुविधेचा वापर करून भाताला योग्य पाणीपुरवठा केला.

पाण्याच्या चांगल्या पुरवठ्यामुळे शेतकऱ्यांनी यंदा प्रथमच रब्बी हंगामात भातपिकाची लागवड केली असून चांगले उत्पादनही मिळाले आहे. मात्र, आता कापणी यंत्र उपलब्ध नसल्याने त्यांना (लोटलीकर) भात पीक काढण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे.रब्बी हंगामात भातपिकाची लागवड केली व चांगले उत्पादन देखील घेतले, अशी माहिती शेतकरी दिलीप लोटलीकर यांनी दिली.

लवकरच मशीनची व्यवस्था होणार

अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, बार्देशमध्ये रब्बी हंगामात भातशेती करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या कमी आहे आणि त्यानुसार भातशेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आवश्यक व्यवस्था केली आहे. लोटलीकर यांच्यासाठी कापणी यंत्राची व्यवस्था करण्यासाठी आवश्यक ती पावले उचलली जात आहेत, त्यामुळे व्यवस्था होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली .

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Session Court: वेश्याव्यवसाय प्रकरणी दोषी ठरलेल्या विजय सिंग याला गुरुवारी ठोठावली जाणार शिक्षा

Canacona: तपासणी टाळण्यासाठी समुद्रातून मद्य तस्करी; काणकोण येथे एकाला अटक

Goa SSC Result Declared: यंदाही मुलीच हुश्शार, गोव्यात दहावीचा 92.38 टक्के निकाल

Xeldem Assault Case: आंब्यावरुन मारहाण, सोनफातर - शेल्‍डे येथे बागमालकास जीवे मारण्याची धमकी

Goa Today's Top News: दहावीचा निकाल, अपघात, चिरे खाणीवर छापा; गोव्यातील बातम्यांचा आढावा

SCROLL FOR NEXT